परदेशात नोकरीचे अमिष दाखवत महिलेची फसवणूक, परराष्ट्र मंत्रालयाकडून सुखरुप सुटका

परदेशात नोकरी करण्याचे आकर्षण प्रत्येकाला असते. पण परदेशात नोकरीला लावतो असे सांगून आतापर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे.

परदेशात नोकरीचे अमिष दाखवत महिलेची फसवणूक, परराष्ट्र मंत्रालयाकडून सुखरुप सुटका

मुंबई : परदेशात नोकरी करण्याचे आकर्षण प्रत्येकाला असते. पण परदेशात नोकरीला लावतो असे सांगून आतापर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे. कुणाचे पैसे घेतले पण नोकरी दिली नाही, तर कुणाला पैसे घेऊन परदेशात पाठवले पण पगार नाही, अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. असाच प्रकार भिवंडीतील एका महिलेसोबत (Fraud with Women) घडला आहे. भिवंडी शहरातील घरकाम करणाऱ्या दोन महिलांना दुबईत (Dubai) काम देतो, असं सांगून त्यांची फसवणूक केली आहे. नूरजहाँ गुलाब शेख असं या फसवणूक झालेल्या महिलेचं (Fraud with Women) नाव आहे.

या महिलांकडून पैसे घेऊन त्यांना ओमान देशात पाठवले. तेथे गेल्यानंतर एका एजंट मार्फत त्यांची विक्री करुन त्यांच्याकडून घरकाम करुन घेतले जात होते. पण ज्या महिला काम करत नाही अशा महिलांना एका रुममध्ये बंद करुन उपाशी ठेवून मारहाण केली जात असे. त्यामुळे महिलेने कुटुंबियांशी संपर्क करुन या घटनेची माहिती दिली. कुटुंबियांनी थेट स्थानिक खासदार कपिल पाटील (MP Kapil Patil) यांच्याशी संपर्क साधत सर्व घटना सांगितली.

त्यानंतर खासदार कपिल पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पाठपुरावा करत दोन महिन्यांनी ओमान येथील उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेचा शोध घेत तिची सुखरुप सुटका केली आणि तब्बल आठ महिन्यांनी तिची मायदेशी रवानगी करण्यात आली. पुन्हा मायदेशी परतल्याने महिला आनंद व्यक्त करत आहे. परंतु या प्रकरणात महिलेची फसवणूक करणारे एजंट फरार आहेत.

कशी झाली फसवणूक ?

भिवंडी शहरातील अमीना बाग, नूरानी मस्जिद या परिसरात नूरजहाँ राहते. त्यानंतर त्याच परिसरातील रहीम नामक युवकाने तिला परदेशात नोकरी देतो, असं अमिष तिला दाखवले. पण नूरजहाँने माझी तब्येत ठीक नसते, असे सांगत तिने जाण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर खोटे अमिष दाखवत तिच्याकडून 50 हजार रुपये घेत तिला ओमान येथे पाठवले. मात्र तिथे विमानतळावर उतरल्यापासून तिच्या मागील दुष्टचक्र सुरु झाले.

विशेष म्हणजे ओमानमध्ये अनेक महिलांना डांबून ठेवले आहे. महाराष्ट्र, हैद्राबाद, कर्नाटक, श्रीलंका, नेपाळ, युगांडा आणि काही गोऱ्या महिलांना येथे डांबून ठेवण्यात आले आहे. येथली सर्व महिलांचा शारीरिक छळ सुरु आहे.

दरम्यान, नूरजहाँ हिची फसवणूक करणाऱ्या एजंटने तिची सोडवणूक करण्यासाठी तिच्या कुटुंबियांकडून दिड लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबियांनीही सोने विकून, व्याजावर पैसे घेऊन एजंटला पैसे दिले. पण अद्यापही हा एजंट पैसे घेऊन फरार आहे. सध्या भिंवडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *