तांब्याचा लोटा दाखवून नेते, अभिनेत्यांना लुटलं, भामटे जेरबंद

एका तांब्याच्या लोट्याच्या माध्यमातून करोडोंची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा मुंबई क्राईम ब्रांचने भांडाफोड केला आहे

तांब्याचा लोटा दाखवून नेते, अभिनेत्यांना लुटलं, भामटे जेरबंद
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 6:05 PM

मुंबई : एका तांब्याच्या लोट्याच्या माध्यमातून करोडोंची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा मुंबई क्राईम ब्रांचने भांडाफोड केला आहे (Mumbai Froud). हे भामटे एका साध्या तांब्याचा लोटा दाखवून तो प्राचीन काळातील असल्याचं सांगत लोकांना मूर्ख बनवत होते. यामध्ये अनेक बडे नेते, अभिनेते आणि व्यापाऱ्यांचाही समावेश आहे (Copper Pot).

या भामट्यांनी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही अनेकांची फसवणूक केली. यामध्ये एका खासदाराचाही समावेश आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठल्याही नेत्याने किंवा आभिनेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. या प्रकरणी ऑक्टोबर महिन्यात चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या सोमवारी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी योगेंद्र प्रजापति, सैयद बाबुल कबीर आणि प्रज्ञनेश द्वाडा या तिघांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या भामट्यांनी एका व्यक्तीची तब्बल दीड कोटींची फसवणूक केल्याचं पोलीस उपायुक्त अकबर पठान यांनी सांगितलं.

अविश्वसनीय कथेवर लोकांचा विश्वास फसवणुकीचं कारण ठरलं

रेडीएशन असलेल्या लोट्याची कहाणी सांगून हे भामटे लोकांची फसवणूक करायचे. अटक करण्यात आलेला प्रज्ञनेश द्वाडा हा मोठ्या पार्टीमध्ये जाऊन बड्या लोकांना एक कहाणी सांगायचा. प्रज्ञनेश लोकांना सांगायचा की त्याच्या एका नातेवाईकाकडे एक रेडीएशन असलेला लोटा आहे. NASA आणि DRDO या लोट्याचा वापर सॅटेलाईट उडवण्यासाठी करतात. नासा या लोट्यासाठी 6,000 कोटी ते 10,000 कोटी रुपये देतं. या लोट्याला BARC मधून टेस्टिंग करुन कंपन्या नासाला पाठवतात. याचा टेस्टिंग रेट 50 लाख असल्याचं प्रज्ञनेश सांगायचा.

त्यानंतर जो कोणी या खोट्या कहाणीवर विश्वास ठेवायचा, ती व्यक्ती प्रज्ञनेश आणि त्याच्या साथीदारांच्या जाळ्यात फसायची. त्यानंतर तो त्या व्यक्तीला बोगस वैज्ञानिक आणि बोगस कंपनी मालकाशी भेट घालून द्यायाचा. लोट्याच्या टेस्टिंगसाठी पैसे उकळल्यानंतर एक तारिख दिली जायची. या तारखेला BARC चा माणूस टेस्टिंगसाठी येणार असल्याचं सांगितलं जायचं, मात्र त्या तारखेला कुणीही यायचं नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.