आई-वडिलांकडून मुलीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह घरातच पुरला

प्रेम प्रकरणातून एका एलएलबीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या तरुणाच्या हत्येचं आधी षडयंत्र रचण्यात आलं, यामध्ये त्याच्या प्रेयसीलाही सहभागी करण्यात आलं आणि त्यानंतर हा हत्येचा थरार रंगला.

आई-वडिलांकडून मुलीच्या प्रियकराची हत्या, मृतदेह घरातच पुरला

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादच्या साहिबाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत एका तरुणाची हत्या झाली होती (Ghaziabad LLB student Murder). त्यानंतर या तरुणाच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला आणि त्यात जे सत्य समोर आले ते पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. कारण, त्या तरुणाची हत्या त्याच्याच प्रेयसीच्या माध्यमातून करण्यात आल्याचं या तपासात उघड झालं. प्रेयसीच्या आई-वडिलांनी हा हत्येचा कट रचला होता. या प्रकरणी पोलिसांनी या तिनही आरोपींना ताब्यात घेतलं आहे (Ghaziabad LLB student Murder).

गाझियाबादमध्ये प्रेम प्रकरणातून एका एलएलबीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या तरुणाच्या हत्येचं आधी षडयंत्र रचण्यात आलं, यामध्ये त्याच्या प्रेयसीलाही सहभागी करण्यात आलं आणि त्यानंतर हा हत्येचा थरार रंगला.

या तरुणाचा त्याच्या पूर्वीच्या घरमालकाच्या मुलीशी प्रेम प्रकरण होतं. हे त्या घरमालकाला सहन झालं नाही आणि त्याने त्याच्या पत्नीसोबत या तरुणाच्या हत्येचा कट रचला. यामध्ये त्याच्या प्रेयसीलाही सहभागी करुन घेतलं. तरुणाची हत्या करण्यासाठी ठरलेल्या दिवसाच्या चार दिवसांपूर्वीच घरात 10 फूट खोल खड्डा करण्यात आला. जिथे नंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला.

या कटदरम्यान तरुणाच्या प्रेयसीच्या माध्यमातून आरोपी घरमालकाने त्याला घरी बोलावून घेतलं. या सर्वांबाबत अनभिज्ञ असलेला तरुण प्रेयसीच्या म्हणण्यावरुन त्यांच्या घरी गेला. तिथे त्याचा मृत्यू त्याची वाट पाहात आहे, असा त्याने कधी विचारही केला नसेल. तरुण घरी आल्यानंतर आधीचा घरमालक आणि त्याच्या पत्नीने गळा आवळून निर्घूणपणे त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह आधीच खोदून ठेवलेल्या खड्ड्यात घरातच पुरला, त्यानंतर हे सर्व आरोपी फारार झाले.

तरुण बेपत्ता झाल्याच्या चार दिवसातच पोलिसांनी त्याचा पुरलेला मृतदेह शोधून काढला. मात्र, या तरुणाची हत्या करणारे सर्व आरोपी फरार होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं.

पंकज नावाचा तरुण साहिबाबाद परिसरातील एका महाविद्यालयात एलएलबीचं शिक्षण घेत होता. तो एक सायबर कॅफेही चालवायचा. पंकजचे गिरधर एनक्लेव कॉलोनी मधील त्याचे आधीचे घरमालक मुन्ना उर्फ हरिओम यांच्या मुलीशी प्रेम संबंध होते. याच द्वेशातून मुन्ना आणि त्याच्या पत्नीने मुलीला सोबत घेत पंकजची हत्या केली, अशी माहिती कार्यक्षेत्र अधिकारी राकेश कुमार यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *