दोन दिवसांपासून कॉलेजमधून बेपत्ता, अर्धवट जळालेला तरुणीचा मृतदेह सापडला

उत्तरप्रदेशमध्ये एका तरुणीचा हात-पाय बांधलेला अर्धवट जळालेला मृतदेह (Girl burn body found in UP) सापडला. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील रायबरेलीमध्ये घडली.

दोन दिवसांपासून कॉलेजमधून बेपत्ता, अर्धवट जळालेला तरुणीचा मृतदेह सापडला

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये एका तरुणीचा हात-पाय बांधलेला अर्धवट जळालेला मृतदेह (Girl burn body found in UP) सापडला. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील रायबरेलीमध्ये घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणीची ओळख झाली असून ती बछरावाच्या बाजारपेठेत राहणारी (Girl burn body found in UP) आहे.

मृत तरुणी विधानपरिषद आमदार प्रताप सिंह यांच्या भावाच्या कॉलेजमध्ये एमएससीमध्ये शिकत होती. दोन दिवसांपासून मृत तरुणी कॉलेजमधून बेपत्ता होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तरुणी बेपत्ता झाल्यानंतर काल (2 फेब्रुवारी) हरचंदपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ढाब्याच्या मागे या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. तसेच मृत तरुणीच्या कुटुंबियांचीही चौकशी करत आहेत.

तरुणीचा मृतदेह सापडताच लखनऊचे आयजी एसके भगतही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाची चौकशी केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पहिले तरुणीची हत्या केली त्यानंतर पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

“मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासठी मृतदेह पाठवला आहे. लवकरच या हत्येचा तपास करुन आरोपीला अटक केली जाईल”, असं एसके भगत यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *