धक्कादायक! धावत्या गाडीत सलग 12 तास तरुणीवर सामूहिक बलात्कार

देशभरात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतेच हैदराबाद येथे एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला.

Rajsthan gang rape in car, धक्कादायक! धावत्या गाडीत सलग 12 तास तरुणीवर सामूहिक बलात्कार

जयपूर : देशभरात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतेच हैदराबाद येथे एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. त्यानंतर आता राजस्थानमध्येही एका तरुणीवर सलग 12 तास गाडीत सामूहिक बलात्कार (Rajsthan gang rape in car) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील जयपूर येथे ही घटना घडली. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून जयपूर पोलिसांनी हे प्रकरण दाबून ठेवले होते, असा गंभीर आरोप केला जात आहे. पीडित तरुणीला तीन दिवसांपूर्वी जवाहरलाल सर्कल येथून तिच्या मित्राने जबरदस्ती गाडीत (Rajsthan gang rape in car) बसवले. यावेळी अजून एक मित्र तेथे आला आणि गाडीत बसून मद्यपान करु लागला.

या गाडीतून आरोपींनी पीडितेला रात्रभर फिरवले. त्यानंतर तरुणीला कालवाड परिसरात घेऊन गेले. या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कालवाडमध्ये जेव्हा गाडीचे डिझेल संपले. तेव्हा गाडी पेट्रोल पंपावर घेऊन गेले. तेव्हा तरुणीने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या मदतीने पोलिसांना फोन केला. पण पोलिसांनी हा विभाग आमच्या हद्दीत येत नाही असे कारण देत तक्रार घेण्यास नकार दिला, असं सांगितलं जात आहे.

यानंतर जवाहरलाल सर्कल पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पण पोलिसांनी तीन दिवस ही घटना दाबून ठेवली होती. या प्रकरणावर अनेकांनी आवाज उठवल्यावर पोलिसांनी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.  मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणावर काय कारवाई होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जाता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *