VIDEO : कल्याणच्या एपीएमसीत हत्येचा थरार, भरदिवसा तरुणीवर चाकूहल्ला

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला. दोन हल्लेखोरांनी तरुणीवर चाकूने वार करत तिला जखमी केले, त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

VIDEO : कल्याणच्या एपीएमसीत हत्येचा थरार, भरदिवसा तरुणीवर चाकूहल्ला

मुंबई : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला. दोन हल्लेखोरांनी तरुणीवर चाकूने वार करत तिला जखमी केले, त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या अवघ्या एका तासात दोघांपैकी एका हल्लेखोराला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. उल्हासनगरच्या वीस वर्षीय सनम करोटीया या तरुणीवर हा जीवघेणा हल्ला झाला.

उल्हासनगर येथे राहणारी सनम करोटिया ही आपल्या मित्रांना भेटण्यासाठी कल्याण पश्चिम येथील एपीएमसी मार्केटमध्ये आली होती. त्यावेळी तिथे दोन तरुण बाईकवरुन आले. ज्या ठिकाणी सनम उभी होती, त्या ठिकाणी त्यांनी बाईक उभी केली. या दोघांपैकी मागे बसलेला तरुण बाईकवरून खाली उतरला आणि तो सनमजवळ गेला. त्यानंतर सनमला काही समजण्याच्या आत या तरुणाने चाकू काढला आणि समनवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दोघांनीही तेथून पळ काढला. या हल्ल्यात समन गंभीर जखमी झाली होती. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सनमला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान सनमचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

कल्याणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी सहा पथक आरोपींच्या शोधासाठी धाडले. पोलिसांना तरुणीच्या अॅक्टिव्हा गाडीमधून मोबाईल सापडला. त्या मोबाईलद्वारे पोलिसांना हल्लेखोराचा सुगावा लागला. त्यानंतर घटनेच्या तासभरात पोलिसांनी बाबू ढकणी या हल्लेखोराला अटक केली. तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

सनम आणि आरोपी बाबू एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखत होते. सनमला एपीएमसी मार्केटमध्ये कुणी बोलावलं होते? बाबू तिकडे कसा पोहचला? आणि त्याने साथीदाराच्या मदतीने सनमची हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. त्रिकोणी प्रेमातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *