काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी बेपत्ता

पणजी : गोव्यातील काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी पीडित तरुणी अचानक बेपत्ता झाली आहे. गोवा पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, पीडित तरुणीला शोधण्यासाठी गोवा पोलिसांनी मोहीमही हाती घेतली आहे. 2016 साली पणजी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून अटानासियो मोनसेरेट उमेदवार होते. त्यांच्यावर तरुणीने बलात्कार …

rape, काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी बेपत्ता

पणजी : गोव्यातील काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी पीडित तरुणी अचानक बेपत्ता झाली आहे. गोवा पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, पीडित तरुणीला शोधण्यासाठी गोवा पोलिसांनी मोहीमही हाती घेतली आहे.

2016 साली पणजी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून अटानासियो मोनसेरेट उमेदवार होते. त्यांच्यावर तरुणीने बलात्कार आणि ड्रग्ज देण्याचा आरोप केला होता. आरोप करणारी तरुणी आता बेपत्ता झाली आहे. ज्यावेळी तरुणीने काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप केला होता, त्यावेळी पीडित तरुणी अल्पवयीन होती.

बलात्कार प्रकरणाचा खटल्याच्या प्रतिक्षेत असणारी पीडित तरुणी गोव्यातील ननद्वारे चालवल्या जाणाऱ्या पुनर्वसन गृहात राहत होती. तिथून 28 एप्रिल रोजी पीडित तरुणी बेपत्ता झाली, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

वेरना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी पीडित तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. ननकडून आधी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, 10 मे रोजी पोलिसांनी या तक्रारीला अपहरणामध्ये बदललं. गोवा पोलिसांकडून पीडित तरुणीचा शोध सुरु करण्यात आला आहे.

काँग्रेस नेत्यावर 2016 साली नेमकी काय तक्रार करण्यात आली होती?

2016 मध्ये काँग्रेस नेते मोनसेरेट यांच्याविरोधात पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मोनसेरेट यांनी पीडित तरुणीला 50 लाख रुपयांना खरेदी करुन, तिला नशा येणारे औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर मानवी तस्करी आणि बलात्कार प्रकरणी मोनसेरेट यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यासह POCSO कायद्याअंतर्गत आणि गोवा बाल अधिनयम अंतर्गतही मोनसेरेट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित तरुणीने साक्ष बदलल्याने काँग्रेस नेत्याला जामीन

काँग्रेस नेते अटानासियो मोनसेरेट यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर, पीडित तरुणीचे आरोप मोनसेरेट यांनी वकिलामार्फत आरोप फेटाळले होते. पीडित तरुणीने सहावेळा आपली साक्ष बदलल्याचे कारण काँग्रेस नेत्याकडून देण्यात आले. त्यामुळे पीडित महिलेच्या साक्षीतल्या विसंगतीमुळे काँग्रेस नेते मोनसेरेट यांना जामीन मिळाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *