लातुरात कोरोना बाधित महिलेची कर्णफुलं रुग्णालयातून चोरीला, कोरोना वॉर्डात तपास कसा करावा?, पोलिसांसमोर प्रश्न

लातुरात कोरोना रुग्णालयातून रुग्णाचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लातुरात कोरोना बाधित महिलेची कर्णफुलं रुग्णालयातून चोरीला, कोरोना वॉर्डात तपास कसा करावा?, पोलिसांसमोर प्रश्न

लातूर : लातुरात कोरोना रुग्णालयातून रुग्णाचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Latur COVID-19 Hospital). शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डातून महिला रुग्णाच्या कानातली सोन्याची फुलं तिथल्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतल्याचा आरोप रुग्णाने केला आहे (Latur COVID-19 Hospital).

अहमदपूर तालुक्यातल्या सावरगाव येथील वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये उपचार घेत होती. यादरम्यान, पीपीई किट घातलेली एक महिला त्या रुग्णाजवळ आली आणि तिने तुझे पती तुझ्या कानातली फुले मागत आहेत, काढून दे, मी त्यांना नेऊन देते, असं सांगून सोन्याची फुलं काढून घेतली. दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या पतीने तिच्याकडे कानातली फुले कुठे गेली, याची विचारणा केली. तेव्हा इथल्या पीपीई किटमधील महिलेने तुमच्याकडेच आणून देण्यासाठी नेली असल्याचं महिलेने सांगितलं.

तेव्हा या वृद्ध दाम्पत्याच्या लक्षात आले की कर्णफुले चोरीला गेली आहेत. वॉर्डात सगळीकडे चौकशी केली. मात्र, काहीच थांगपत्ता लागला नाही. डिस्चार्ज घेऊन महिला घरीही गेली. मात्र, अंदाजे 12 हजार रुपये किंमतीच्या त्या अडीच ग्रामच्या फुलांचा शोध लागला नाही.

पोलिसात तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कोरोना वॉर्डात कसा तपास करणार? असा सवाल करत त्यांनी रुग्णाला वापस पाठवले.

महिला रुग्णाचे पती विश्वभंर बारोळे हे गेली अनेक दिवस कोरोना वॉर्ड, डीन ऑफिस आणि पोलीस ठाण्याशी संपर्क साधत आहेत. मात्र, त्यांचा साधा अर्जही पोलिसांनी घेतलेला नाही. एका महिन्यात त्यांच्या गावाकडून लातूरला चार चकरा झाल्या. मात्र, कर्णफुलांचा शोध लागला नाही.

Latur COVID-19 Hospital

संबंधित बातम्या :

पेटीएम कंपनीच्या कर्मचाऱ्यानंच ग्राहकाला लावला 50 हजारांचा चुना; सायबर सेलने ठोकल्या बेड्या

धुळ्यात पोलिसांकडून गांजाची शेती उद्ध्वस्त, 6 लाखांची गांजा रोपं जप्त

नाशिक पोलीस आयुक्तांचा नवा उपक्रम, गुन्हेगारी रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *