गोरेगावमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन बड्या अभिनेत्रींना अटक

गोरेगावमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Goregaon Sex Racket Burst, गोरेगावमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन बड्या अभिनेत्रींना अटक

मुंबई : मुंबईतील गोरेगावमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये चाललेल्या सेक्स रॅकेट पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अभिनेत्रींना बेड्या (Goregaon Sex Racket Burst) ठोकण्यात आल्या आहेत.

गोरेगावमधील संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली. त्यावेळी दोन अभिनेत्रीही तिथे सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे यापैकी एक अभिनेत्री ही ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाची एक्स गर्लफ्रेण्ड असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरी आरोपी ही उदयोन्मुख अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे.

डीसीपी डॉ. डी स्वामी यांच्या नेतृत्वात खोटा ग्राहक पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. पोलिसांनी आधी त्यांना बेड्या ठोकल्या, नंतर धाडीमध्ये पळून जाणारी अभिनेत्री रंगेहाथ सापडली.

नववर्षात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची मुंबईतील ही दुसरी घटना आहे. पाच जानेवारीला दहीसरच्या गिरी निवास रावळपाडा भागात चालणाऱ्या सेक्स रॅकेटमधून तीन मुलींची सुटका झाली होती, तर एका दलाला अटक करण्यात आली होती.

दोन मुली पश्चिम बंगालच्या होत्या, तर एक तरुणी ही बांगलादेशाची असल्याचं समोर आलं होतं. तिच्याकडे बांगलादेशाचा पासपोर्ट आणि व्हिसाही सापडला होता.

मुंबईमध्ये अनेक अनधिकृत धंदे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचं बरेच वेळा समोर आलं आहे. त्यामध्ये सेक्स रॅकेट (Goregaon Sex Racket Burst) हा एक प्रमुख व्यापार चालतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *