गुजरात पोलिसांची लोणावळ्यात येऊन कारवाई, स्थानिक पोलीस अनभिज्ञ

लोणावळा ग्रामीण पोलीस (Lonavala Police) स्टेशनच्या हद्दीतील प्रेमनगर कुसगाव याठिकाणी गुजरात पोलीसांनी (Gujarat Police) परस्पर कारवाई केली आहे.

गुजरात पोलिसांची लोणावळ्यात येऊन कारवाई, स्थानिक पोलीस अनभिज्ञ

पुणे : लोणावळा ग्रामीण पोलीस (Lonavala Police) स्टेशनच्या हद्दीतील प्रेमनगर कुसगाव याठिकाणी गुजरात पोलीसांनी (Gujarat Police) परस्पर कारवाई केली आहे. गुजरात पोलिसांच्या गाडीतून काही अल्पवयीन मुलांना घेऊन जात असल्याचे फोटो व व्हिडीओ (minors Girls Photo And Video) सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. गुजरातमधील काही अल्पवयीन मुले पळवून आणून याठिकाणी दोन दिवसांपूर्वी ठेवण्यात आल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. मात्र या कारवाईबाबत (Gujarat police raid in lonavala) लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, त्यांना या कारवाईबाबत काहीच माहिती दिली नसल्याचे दिसून येत आहे.

लोणावळ्यातील प्रेमनगर भागात दोन-तीन दिवसांपूर्वी 10-12 मुलांसह काही महिला भाड्याने राहण्याकरिता आल्या होत्या. त्या महिला राहत असलेल्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी शुक्रवारी (13 सप्टेंबर) छापा टाकला. यात अल्पवयीन मुलं, मुली आणि महिलांना ताब्यात घेत गाडीत (Gujarat police raid in lonavala) बसवण्यात आलं.

या कारवाई दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ही कारवाई नेमकी कशाबाबत होती याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच एवढी अल्पवयीन मुले, मुली कोणी व कशाकरिता आणली होती. तसेच लहान मुले पळवणारे रॅकेट आपल्या भागात आलं आहे का? यासारख्या अनेक प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे.

त्याशिवाय गुजरात पोलिसांनी या कारवाईबाबत ग्रामीण पोलिसांना कोणतीही कल्पना का दिली नाही. ही कारवाई करणारे नेमके पोलीस होते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहेत. लोणावळा ग्रामीण हद्दीत कारवाई होत असताना येथील पोलिसांना कोणतीही कल्पना नसणे किंवा ती न देणे यामागचे गुपित काय या चर्चा सध्या सुरु आहे. त्याशिवाय अशाप्रकारची अजून काही रॅकेट या भागात सक्रीय आहेत का? या प्रकरणातील पोलीस व अल्पवयीन मुलं-मुली कोण होते याचाही शोध ग्रामीण पोलीस घेणार का असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *