चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा, तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्याला अटक

मुंबई : चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमरा लावून तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार अंधेरीतील एका खासगी कंपनीत घडला. महिला  कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा भांडोफोड झाला आणि घटना उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच कंपनीतील हाऊसकिपर गणेश इतवार नडगे (37 वर्षे) याला सहार पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त …

चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा, तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्याला अटक

मुंबई : चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमरा लावून तरुणीचा व्हिडीओ काढणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार अंधेरीतील एका खासगी कंपनीत घडला. महिला  कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा भांडोफोड झाला आणि घटना उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच कंपनीतील हाऊसकिपर गणेश इतवार नडगे (37 वर्षे) याला सहार पोलिसांनी अटक केली.

आरोपींकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला. मोबाईलवर पीडित तरुणीचे 10 मिनिटांचे व्हिडीओ रेकॉडिंग झाल्याचे उघडकीस आले. आरोपीला अटकेनंतर त्याला 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. पीडित  तरुणी 27 वर्षांची असून अंधेरी येथे राहते. अंधेरी परिसरातील एका खासगी कंपनीत ती पेस्ट्री शेफ म्हणून कामाला आहे. कंपनीच्या पहिल्या मजल्यावर पुरुष आणि महिला कर्मचार्‍यांसाठी चेजिंग रुम तयार करण्यात आली आहे. या रुमचा पुरुषांसह महिला कर्मचारीही वापर करतात.

गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता सदर तरुणी कामावर आली. काम करताना ती पावणेदहा वाजता चेजिंग रुममध्ये गेली. तेथे केस सेटअप करताना तिला रुमच्या खिडकीजवळ एक मळकट कपडा दिसला. या कपड्याच्या आतमध्ये एक मोबाईल ठेवण्यात आला होता. हा मोबाईल हातात घेतल्यानंतर तिला मोबाईलचे रेकॉडिंग सुरू असल्याचे दिसून आले. तिने मोबाईलची तपासणी केली असता तिचा 10 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉडिंग झाल्याचे लक्षात आले. या प्रकाराने तिला धक्का बसला. त्यानंतर तिने हा मोबाईल घेऊन वरिष्ठांना ही माहिती दिली.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी गणेशला गुरुवारी सायंकाळी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपी गणेश सध्या गोरेगाव येथील आरे कॉलनीत खांबाचा पाडा (युनिट 25) येथे राहतो.

तरुणीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून हा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. मात्र, आरोपीने इतरही काही लोकांचे व्हिडीओ तयार केले आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *