चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, आरोपी पती स्वत: पोलिसात हजर

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना (Husband killed wife) घडली.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, आरोपी पती स्वत: पोलिसात हजर

अहमदनगर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा खून केल्याची घटना (Husband killed wife) घडली. त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. अहमदनगरमधील राहता तालुक्यातील एकरुखे गावात ही घटना घडली. विशेष म्हणजे पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबूली (Husband killed wife) दिली.

राहाता तालुक्यातील एकरुखे येथील सुनील लेंडे हा पत्नी छाया लेंडे हिच्यावर कित्येक वर्षांपासून संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्या अनेकदा वाद व्हायचे. शनिवारी (22 फेब्रुवारी) सुनील लेंडे याने आई-वडिलांना जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर आई, वडील आणि 3 लहान मुलांना बाहेरगावी पाठवले.

यानंतर दुपारी 4 च्या सुमारास सुनील आपल्या पत्नीला घेऊन घरापासून 3 किमी अंतरावरील मळ्यात घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करत तिचा खून (Husband killed wife) केला.

त्यानंतर रात्री साडेआठच्या दरम्यान आरोपीने पत्नीचा मृतदेह पोत्यात टाकून एकरुखे – नपावाडी रोडला निर्जनस्थळी घेऊन गेला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आरोपी सुनील याने स्वतः राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, मृत छाया हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी सुनील याला न्यायालयात हजर केले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्याला चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली  (Husband killed wife) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *