पत्नीचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवून पतीचा पळ

बीड : ऊसतोड मजूर पत्नीचा मृतदेह पोलीस ठाण्यात सोडून पती आणि नातेवाईक पसार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. घटनेनंतर महिलेकडील नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीचा मृतदेह पोलीस ठाणे परिसरात सोडून जाणाऱ्या केशव काळे याच्यावर मात्र अद्याप …

पत्नीचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवून पतीचा पळ

बीड : ऊसतोड मजूर पत्नीचा मृतदेह पोलीस ठाण्यात सोडून पती आणि नातेवाईक पसार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. घटनेनंतर महिलेकडील नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीचा मृतदेह पोलीस ठाणे परिसरात सोडून जाणाऱ्या केशव काळे याच्यावर मात्र अद्याप कसलाच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

कविता काळे असं मयत मजूर महिलेचं नाव आहे. पतीसोबत दोन मुलांसह ती ऊस तोडणीसाठी कोल्हापूर येथे गेली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी कविताचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. कविताच्या पतीने माहेरकडील मंडळीला फोन लावला आणि पत्नी मयत असल्याची घटना कळवली. मात्र सासरची मंडळी एका मार्गाने येत असतानाच केशव काळे आणि त्याच्या नातेवाईकांनी दुसऱ्या मार्गाने कविताचा मृतदेह गेवराई येथे आणला.

कविताचे नातेवाईक मारहाण करतील या भीतीपोटी केशव आणि त्याच्या नातेवाईकांनी कविताचा मृतदेह गेवराईच्या पोलीस ठाणे परिसरात रुग्णावाहिकेमध्ये ठेवून पळ काढला. घटना समजल्यानंतर विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस ठाण्यातच तब्बल दोन तास ठिय्या मांडला.

अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने कवितावर तिच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. कविताला पोहता येत होते. त्यामुळे विहिरीत पडून तिचा मृत्यू होऊ शकत नाही, तर तिचा खून करून प्रेत विहिरीत टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गेवराई पोलिसांनी कसलाच गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचा आरोग्य मयत कविताच्या नातेवाईकांनी केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *