माहेरला गेलेली पत्नी परत येईना, नवऱ्याने 'पर्सनल' व्हिडीओ फेसबुकवर टाकला!

नागूपर : पती-पत्नीचं नातं हे विश्वासाचं असतं. पण जेव्हा नात्यांमधूनच विश्वास उडून जातो, तेव्हा हे नातं नाममात्र राहतं आणि घात करतं. असाच एक प्रकार घडलाय, उपराजधानी नागपुरात. पत्नी सारखी माहेरी जायची, पतीचं पित्त खवळलं. काही केल्या पत्नी ऐकत नाही, परत घरी येत नाही, म्हणून पती पिसाटला आणि यानंतर त्याने जे कृत्य केलं, त्यामुळे तो थेट …

, माहेरला गेलेली पत्नी परत येईना, नवऱ्याने ‘पर्सनल’ व्हिडीओ फेसबुकवर टाकला!

नागूपर : पती-पत्नीचं नातं हे विश्वासाचं असतं. पण जेव्हा नात्यांमधूनच विश्वास उडून जातो, तेव्हा हे नातं नाममात्र राहतं आणि घात करतं. असाच एक प्रकार घडलाय, उपराजधानी नागपुरात. पत्नी सारखी माहेरी जायची, पतीचं पित्त खवळलं. काही केल्या पत्नी ऐकत नाही, परत घरी येत नाही, म्हणून पती पिसाटला आणि यानंतर त्याने जे कृत्य केलं, त्यामुळे तो थेट तुरुंगात पोहोचला. पत्नी विरहाचं व्हायरल वास्तव पाहून अनेकांना धक्का बसला. या पतीने केलेलं कृत्य संताप आणणारं आहे. सोशल मीडियाचा गैरवापर होतो, तेव्हा काय घडू शकतं, ते पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

‘फेसबुकवर एका मुलीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याची गावभर चर्चा रंगली आणि गावात हाहाःकार माजला.. पाहता पाहता पाच हजारहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेयर केला आणि पाहिलाही. अखेर हा व्हिडीओ त्याच मुलीच्या मोबाईलवर गेला, जीचा हा अश्लील व्हिडीओ व्हायरल होत होता. तो पाहून मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली… तीने थेट पोलीस ठाणं गाठलं, तक्रार नोंदवली, तपासात व्हिडीओ व्हायरल करणारा इतर कुणी नाही, तर मुलीचा पतीच निघाला… ज्याच्यासोबत तिने लव्ह मॅरेज केलं होतं.

घटना नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील आहे. येथील पीडित मुलीचं गावातीलच एका तरुणावर प्रेम जडलं, त्यांनी लग्न केलं… जोडपं इथे मुलाच्या घरी काही दिवसांपासून राहत होतं.. पण पतीला कुठलेही काम नसल्याने त्रस्त वडिलांनी दोघाही पती-पत्नीला घराबाहेर काढलं… त्यांनतर दोघेही मध्य प्रदेश येथील वडचिचोली येथे राहू लागले. मात्र आयुष्यभर आनंदी ठेवण्याचं अभिवचन देणारा पती पीडित पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला.

पतीने बायकोचा अश्लील व्हिडीओ सुद्धा तयार केला होता. पतीच्या नेहमीच्या या जाचाला कंटाळून पीडितेने आपल्या माहेरी जाण्याची गोष्ट केली. परंतु, पतीने नकार दिला. काही दिवसांनी जेव्हा पती कामानिमित्त नागपूरला गेला, तेव्हा 16 डिसेंबरला पत्नीने पळ काढून माहेर गाठलं. पण पत्नी माहेरी गेल्याची बाब आरोपी पतीला खटकली आणि त्याने पत्नीची बदनामी करत तिचा अश्लिल व्हिडीओ फेसबुकवर उपलोड केला.

सैतान पतीला पत्नीने पोलिसांत फिर्याद दिल्याचं समजलं, आणि त्याने सोमवारच्या रात्री कळमेश्वर बस स्थानक परिसरात पीडित पत्नीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित पत्नीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत केली. सध्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पतीच्या या टोकाच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *