पुण्यात तरुणावर अ‍ॅसिड हल्ला आणि गोळीबार, हल्लेखोराची आत्महत्या

(तरुणावर अॅसिड हल्ला करणारा आरोपी) पुणे : शहरातील सदाशिव पेठेत एका तरुणावर अ‍ॅसिड हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (16 एप्रिलला) रात्रीच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे हल्लेखोराने हल्ल्यानंतर स्वतःवरही गोळीबार करुन आत्महत्या केली. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीर  जखमी झाला असून उपचारासाठी त्याला पुना हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले. पीडित तरुण मैत्रिणीसोबत घटनास्थळी थांबला होता. …

Pune Crime, पुण्यात तरुणावर अ‍ॅसिड हल्ला आणि गोळीबार, हल्लेखोराची आत्महत्या

(तरुणावर अॅसिड हल्ला करणारा आरोपी)

पुणे : शहरातील सदाशिव पेठेत एका तरुणावर अ‍ॅसिड हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (16 एप्रिलला) रात्रीच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे हल्लेखोराने हल्ल्यानंतर स्वतःवरही गोळीबार करुन आत्महत्या केली. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीर  जखमी झाला असून उपचारासाठी त्याला पुना हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले.

पीडित तरुण मैत्रिणीसोबत घटनास्थळी थांबला होता. त्याचवेळी त्याच्यावर अ‍ॅसिड टाकण्यात आले. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी आणि पीडित तरुणाच्या आईचे अनैतिक संबंध होते. 4 महिन्यापूर्वीच संबंधित तरुणाच्या आईने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याचा राग डोक्यात ठेऊन आरोपीने या तरुणावर अॅसिड हल्ला आणि गोळीबार केला. तरुणावर 2 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील 1 गोळी त्याच्या पाठीत लागली.

डक्टमध्ये अडकल्याने आत्महत्या?

हल्ल्यानंतर हल्लेखोर जवळील सोसायटीमध्ये पळाला. तो इमारतीच्या डक्टमध्ये उतरला. मात्र, त्यानंतर त्याला तेथून कुठेही जाता आले नाही. अगदी पुन्हा वरतीही येणे शक्य झाले नाही. त्यानंतर काही वेळेतच गोळी झाडल्याचा आवाज आला. पाहणी केली असता आरोपीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

आरोपी येताना सोबत मोठा शस्त्रसाठा घेऊन आला होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिशवीमध्ये पिस्तुल, अॅसिड आणि इतर काही घातक हत्यारे सापडली आहेत. पोलिसांनी ही पिशवी ताब्यात घेतली आहे. आरोपीने छर्र्याच्या बंदुकीने गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या:

पुण्यात तरुणावर अॅसिड हल्ला करून पोलिसांवर गोळीबार

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *