नागपुरात अनलॉकिंगनंतर गुन्हेगारी उफाळली, पोलिसांकडून ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ सुरु

राज्याची उपराजधानी नागपुरात अनलॉकिंगनंतर गुन्हेगारी उफाळल्याचं पाहायला मिळत आहे (Operation Crackdown to stop crime in Nagpur).

नागपुरात अनलॉकिंगनंतर गुन्हेगारी उफाळली, पोलिसांकडून 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' सुरु
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 2:31 PM

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात अनलॉकिंगनंतर गुन्हेगारी उफाळल्याचं पाहायला मिळत आहे (Operation Crackdown to stop crime in Nagpur). लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपूरमध्ये हत्यांचं सत्र सुरु आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून नागपूर पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरु केलं आहे. यात 6,000 पेक्षा जास्त गुन्हेगारांना ट्रॅक केलं जातंय.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये नागपूरातील गुन्हेगारी नियंत्रणात होती. मात्र, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करुन अनलॉकला सुरुवात होताच नागपूरमध्ये गुन्हेगारांचा खुला वावर वाढला. काही गुन्हेगार कारागृहातून पॅरोलवर बाहेर पडले. त्यामुळे नागपूरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. अनलॉकिंगमध्ये शहर पोलिसांच्या हद्दीत खुनाचं सत्रंच सुरु झालंय. गुन्हेगारांमध्ये टोळी युद्ध सुरु झाल्याची स्थिती आहे. एका टोळीकडून दुसऱ्याचा काटा काढायचा म्हणूनही शहरात खुनाच्या घटना झाल्या. गेल्या काही दिवसांत 7 पेक्षा जास्त खुनांच्या घटनांनी शहर हादरलं आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरु केलंय.

ऑपरेशन क्रॅकडाऊनमध्ये प्रत्येक रेकॉर्डवरच्या गुन्हेगारावर आणि त्याच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांची बारीक नजर आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी याविषयी माहिती दिली.

दरम्यान, नागपुरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याआधी नागपुरात गुंडानेच गुंडाचं अपहरण करुन हत्या केल्याचा प्रकारही घडला होता. पैशाच्या वादातून ही हत्या झाली होती. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा थरारक प्रकार घडला होता. मोटर सायकलवरुन आलेल्या तीन आरोपींनी एकाच मोटर सायकलवरुन अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली.

सनी जंगीड हा अंत्यसंस्कारासाठी गेला होता. घाटावरुन परतत असताना त्याला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने त्याला एका ठिकाणी बोलावलं. संनी जंगीड त्या ठिकाणी पोहोचला. तिथे मोटर सायकलवरुन आलेल्या 3 युवकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर त्या तिघांनी त्याला मोटार सायकलवर बसवून थुंडा मारोती भागातील जंगलात निर्जन ठिकाणी नेलं. तिथे दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर सनीचा मृतदेह जंगलात फेकून दिला (Nagpur Crime News). अपहरणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शोध सुरु केला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असता त्याने या हत्येची माहिती दिली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते बाईक चोरी करायचे. चोरीच्या पैशांवरुन त्यांच्यात वाद होता. त्याशिवाय, वर्चस्वाची लढाईसुद्धा, त्यामुळे ही हत्या झाली असून पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरु केला. मात्र, या हत्येनंतर देखील परिसरात गॅंगवॉर पसरण्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

संबंधित बातम्या :

Nagpur Crime | नागपुरात गुन्हेगारी थांबेना, गुंडांकडून गुंडाचं अपहरण, दगडाने ठेचून हत्या

नागपूरची ‘लुटेरी दुल्हन’ गजाआड, उच्चशिक्षित बेरोजगारांना प्रीती दासचा लाखोंना गंडा

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

Operation Crackdown to stop crime in Nagpur

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.