6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, IPS अधिकाऱ्याने आरोपीला थेट गोळ्या घातल्या

IPS अजयपाल शर्मा यांच्या या आक्रमक कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शर्मा यांची चर्चा सुरु आहे. नाजील असं आरोपीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, IPS अधिकाऱ्याने आरोपीला थेट गोळ्या घातल्या

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या मारुन अटक केली. IPS अजय पाल शर्मा यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शर्मा यांची चर्चा सुरु आहे. नाजील असं आरोपीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण

आरोपी नाजीलवर 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याचा आरोप आहे. गेल्या शनिवारी (23 जून) एका मुलीचा मृतदेह पोलिसांना मिळाला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी सिविल लाईन्स विभागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आरोपीला अटक करायला गेले तेव्हा पोलिसांना पाहून आरोपीने गोळीबार केला. पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. यावेळी त्याला गोळी लागताच तो जमीनीवर कोसळला आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलीस अधीक्षक अजयपाल शर्मा म्हणाले, “45 दिवसांपूर्वी एक मुलगी गायब झाली होती. शनिवारी तिचा मृतदेह मिळाला. मृतदेह पूर्णपणे जळाला होता. याप्रकरणी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. खबऱ्याच्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. हा गुन्हा 7 मे रोजी दाखल केला होता”.

अजयपाल शर्मांच्या या कारवाईमुळे सध्या देशभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर शर्मा यांना सिंघम, देव आणि सुपरमॅनची उपमा दिली जात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या मोहिमेमुळे नक्कीच गुन्हेगारांना लगाम बसेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *