लोंखडी गेट अंगावर पडून सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

भिवंडीत पूर्णा या गावात बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेला लोखंडी गेट अंगावर पडून सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू (Iron gate fall upon children) झाला.

लोंखडी गेट अंगावर पडून सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

ठाणे : भिवंडीत पूर्णा या गावात बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेला लोखंडी गेट अंगावर पडून सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू (Iron gate fall upon children) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कन्हैया दुबे असं मृत (Iron gate fall upon children) झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. कन्हैयाच्या जाण्याने त्याच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

भिवंडी तालुक्यातील पुर्णा गावात भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खंडागळे यांचा आनंद व्हिला बंगला आहे. या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर भलामोठा लोखंडी गेट लावण्यात आला आहे. 2 जानेवारी 2020 रोजी दुपारी दीडच्या सुमारास या बंगल्यामधील महिलेने गेट बंद करण्यासाठी शेजारीच रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना आवाज दिला. यावेळी तेथील तीन ते चार मुले हे काम करण्यासाठी पुढे सरसावली. ज्यामध्ये मृत कन्हैया दुबेचाही समावेश होता.

लहान मुलं गेट ढकलण्यासाठी काही समोरुन तर काही मागून गेट ढकलू लागली. यावेळी गेट चॅनेलच्या पूर्णपणे बाहेर निघाला असता त्याचा आधार सुटला. त्यामुळे गेट रस्त्याच्या दिशेने पडला. यावेळी समोरील बाजून गेट ढकलत असणाऱ्या कन्हैयाच्या अंगावर पडला. दीडशे ते दोनशे किलो वजनाचा गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मारहाण झाली. त्याला तातडीने काल्हेर येथील एस. एस. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत नारपोली पोलिसांनी कन्हैया दुबेच्या मृत्युची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कन्हैयाच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे त्याच्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली, असं वरीष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *