4 पथकं, 70 पोलीस, जळगावातील थरारक हत्याकांडाचा तपास, पहिल्या संशयिताला बेड्या

संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरविणार्‍या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडप्रकरणी जिल्हा पोलीस दलासह विविध जिल्ह्याच्या चार पथकांच्या एकत्रित मेहनतीने 6 दिवसात पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.( Jalgaon Police arrested accused in raver borkheda murder case)

4 पथकं, 70 पोलीस, जळगावातील थरारक हत्याकांडाचा तपास, पहिल्या संशयिताला बेड्या
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 8:13 PM

जळगाव: संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरविणार्‍या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडप्रकरणी जिल्हा पोलीस दलासह विविध जिल्ह्याच्या चार पथकांच्या एकत्रित मेहनतीने 6 दिवसात पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. महेंद्र सिताराम बारेला वय 19 रा. केर्‍हाळा ता. रावेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. ( Jalgaon Police arrested first accused in raver borkheda murder case)

विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांसह यांच्या 70 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरु होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बोरखेडा येथे 16 ऑक्टोंबर रोजी 13 वर्षाची मुलगी, 11 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाच्या मुलगा व 6 वर्षाची मुलगी या चौघांची कुर्‍हाडीने निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. यातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले होते. त्यानुसार याप्रकरणी संशयितांविरोधात रावेर पोलीस स्टेशनला भा.द.वि.क .302 , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर तपासा दरम्यान 376 , 452 , लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,10,12 अन्वये कलमान्वये वाढ करण्यात आलेली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेरवरून एक किलोमीटर अंतरावर बोरखेडा रस्त्यावर असलेल्या एका शेतात सालदार म्हणून काम पाहणाऱ्या कुटुंबातील चार अल्पवयीन भावंडांची हत्या झाल्याने महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात खळबळ उडाली होती.या घटनेवेळी त्या मुलांचे वडील आणि आई मूळगावी खरगोन येथे गेले होते. भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती.

संबंधित बातम्या :

जळगावात चौघांची कुऱ्हाडीने हत्या, शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

‘त्या’ चार अल्पवयीनांची हत्या करणाऱ्या दोषींना 24 तासांत पकडा, नातेवाईकांची आर्त हाक

( Jalgaon Police arrested first accused in raver borkheda murder case)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.