पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी जाळ्यात, औरंगाबादच्या आरोपीला झारखंडमध्ये बेड्या

ऋषिकेश देवरीकर हा मुरली, शिवा, राजेश, भास्कर अशा वेगवेगळ्या नावांनी झारखंडमधील धनबादमध्ये राहत होता.

पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी जाळ्यात, औरंगाबादच्या आरोपीला झारखंडमध्ये बेड्या

बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी झारखंडमधून अटक (Gauri Lankesh Murder Suspect arrest) केली आहे. कर्नाटक पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने धनबादमध्ये ही कारवाई केली. आरोपी ऋषिकेश देवरीकर हा मूळ औरंगाबादचा असल्याची माहिती आहे.

ऋषिकेश देवरीकरवर गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांची पाळत होती. ऋषिकेश वेगवेगळ्या नावांनी झारखंडमधील धनबादमध्ये राहत होता. मुरली, शिवा, राजेश, भास्कर अशी वेगवेगळी नावं त्याने धारण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर कतरास शहरातील भगत मोहल्ला परिसरातून त्याची धरपकड करण्यात आली.

बंगळुरुमध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी गोळ्या झाडून हत्या झाली होती. बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत्या घरी रात्री आठ वाजताच्या सुमारास गौरी लंकेश यांच्यावर गोळीबार झाला होता. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या.

संशयित मारेकऱ्यांपैकी एक जण घराजवळ त्यांची वाट पाहत होता. त्याने गौरी लंकेश यांच्यावर पहिल्यांदा गोळी झाडली होती. तर इतर दोघा संशयितांनी त्यांचा ऑफिसपासून घरापर्यंत पाठलाग केला होता. तिघांनी मिळून गौरी लंकेश यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. गौरी यांचं डोकं, गळा आणि छातीत गोळी लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हत्येवेळी आरोपींनी हेल्मेट घातल्यामुळं सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांची ओळख पटण्यात अडचणी येत होत्या. (Gauri Lankesh Murder Suspect arrest)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *