शिवसेना नगरसेविकेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा

पोलिसात तक्रार केल्यास पाच वर्षांची मुलगी आणि पतीला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपी साईनाथ तरेने पीडितेला दिली होती.

शिवसेना नगरसेविकेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 3:54 PM

कल्याण : कल्याणमध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेविका मनिषा तरे यांचा पती साईनाथ तरे याच्याविरोधात कोळसेवाडी पोलिसात गुन्हा (Sainath Tare Rape Case) दाखल करण्यात आला आहे.

ब्लॅकमेल करत आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिसात तक्रार केल्यास पाच वर्षांची मुलगी आणि पतीला जीवे ठार मारण्याची धमकी आरोपी साईनाथ तरेने पीडितेला दिली होती. पीडितेकडून दमदाटी करत कोणतीही तक्रार नसल्याची नोटरी करुन घेण्यापर्यंत आरोपीची मजल गेली होती.

आरोपी साईनाथ तरेने तक्रारदार महिलेला सप्टेंबर 2018 मध्ये व्यवसायात भागिदारीसाठी नेतिवली भागातील मेट्रो मॉलला बोलावून घेतलं. मात्र भेटीनंतर महिलेने भागिदारीस नकार दर्शवल्यामुळे आरोपीने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

‘मला तुझ्या व्यवसायात इंटरेस्ट नसून तुझ्यात इंटरेस्ट आहे’ असं आरोपीने पीडितेला सांगितलं. त्याचप्रमाणे फेसबुकवर अश्लील फोटो पाठवल्याचाही आरोपही महिलेने केला आहे.

तरेने महिलेला आपल्या ऑडी कारमध्ये बसवून तिचे जबरदस्ती चुंबन घेतले. याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करुन तो व्हायरल करण्याची भीतीही घातली. त्यानंतर कार पत्रीपूल एपीएमसी मार्केटच्या पाठीमागे नेऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

दमदाटी करत आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याची नोटरी तरेने लिहून घेतली. पीडितेला आत्महत्या करण्यापर्यंत शारीरिक आणि मानसिक त्रास होईपर्यंत छळ केल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी साईनाथ तरे हा व्यवसायाने उद्योजक आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास तो इच्छुक होता. भाजपने घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना तरेने हजेरीही लावली होती. (Sainath Tare Rape Case)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.