मुंबईच्या वेशीवर किडनीकांड, मुलांच्या किडन्या काढून मृतदेह पुरले?

मुंबई: मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंब्रा परिसरात सध्या पालक एका अनामिक भीतीने ग्रासले आहेत. एका दहशतीखाली वावरत आहेत.  मुंब्र्यातील आजमीनगर परिसरातील मुले अनेक दिवसांपासून गायब होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच परिसरातून दोन मुलांचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी मोठ्या शिताफिने या अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. मात्र तपासात जी माहीती समोर आली, त्यामुळे पोलिसांनादेखील धक्का बसला.  शिळ …

मुंबईच्या वेशीवर किडनीकांड, मुलांच्या किडन्या काढून मृतदेह पुरले?

मुंबई: मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंब्रा परिसरात सध्या पालक एका अनामिक भीतीने ग्रासले आहेत. एका दहशतीखाली वावरत आहेत.  मुंब्र्यातील आजमीनगर परिसरातील मुले अनेक दिवसांपासून गायब होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच परिसरातून दोन मुलांचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी मोठ्या शिताफिने या अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या. मात्र तपासात जी माहीती समोर आली, त्यामुळे पोलिसांनादेखील धक्का बसला.  शिळ डायघर पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींमध्ये एक आफ्रिन नावाची महिलादेखील आहे. तिने जी माहीती सांगितली त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली. आफ्रिनने पोलिसांना सांगितल की अशा 10 ते 11 मुलांना शिळ डायघर डोंगर परिसरात ठार मारुन पुरलं आहे.

ही धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांनी 5 तास जेसिबीच्या साहाय्याने डोंगर परिसर खणून काढला. पण हाती काहीच न मिळाल्याने आरोपी पोलिसांची दिशाभूल करतेय की काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र मुलं आहेत कुठे याचा तपास पोलिसांकडून सुरुच आहे.

अहमद शाह नावाच्या एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करणाऱ्या आफ्रिन खान या 20 वर्षीय तरुणीला जेव्हा डायघर पोलिसांनी अटक केली, तेव्हा तिने ही धक्कादायक माहिती उघड केली. आणखी 10 ते 11 मुलांना सहारा कॉलनीजवळील डोंगरात पुरल्याची धक्कादायक माहिती तिने पोलीस तपासात दिली. यानंतर मात्र पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. मंगळवारी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या भागात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन पोलिसांनी पाहणी केली. पण प्रत्यक्षात काहीही निष्पन्न झालं नाही त्यामुळे आफ्रिन पोलिसांना भूलथापा देण्याचा प्रयत्न करत आहे की काय असा सवाल आता निर्माण झाला आहे.

याच परिसरातून आणखी काही मुलं बेपत्ता झाल्याचंही बोललं जात आहे. पण ती मुले कुठे आहेत, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. पोलिसांकडून या मुलांचा शोध सुरु आहे, पण जर हे खरं असेल तर धक्कादायक खुलासा होणार, एवढं मात्र नक्की.

VIDEO: मुंबईच्या वेशीवर किडनीकांड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *