चंद्रपुरात सावकाराने महिलेला घरी जाऊन पेटवलं

चंद्रपूर : चंद्रपुरात अवैध सावकाराच्या जुलुमाला अखेर पीडित महिला बळी ठरल्याची घटना समोर आली आहे. 7 मे रोजी एका खाजगी सावकाराने हरिणखेडे कुटुंबियांच्या घरी जात 1 लाख उरलेल्या रकमेची मागणी केली. यावेळी हरिणखेडे यांनी रक्कम न दिल्याने सावकाराने घरात उपस्थित माय-लेकावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याघटनेत जखमी झालेल्या महिलेचा आज (14 […]

चंद्रपुरात सावकाराने महिलेला घरी जाऊन पेटवलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

चंद्रपूर : चंद्रपुरात अवैध सावकाराच्या जुलुमाला अखेर पीडित महिला बळी ठरल्याची घटना समोर आली आहे. 7 मे रोजी एका खाजगी सावकाराने हरिणखेडे कुटुंबियांच्या घरी जात 1 लाख उरलेल्या रकमेची मागणी केली. यावेळी हरिणखेडे यांनी रक्कम न दिल्याने सावकाराने घरात उपस्थित माय-लेकावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याघटनेत जखमी झालेल्या महिलेचा आज (14 मे) मृत्यू झाला आहे. कल्पना हरिणखेडे अंस मृत महिलेचं नाव आहे.

चंद्रपूर शहरातील सरकार नगरात राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू यांच्याकडून तीन लाख रुपयांचं व्याजी कर्ज घेतलं होतं. यातील दोन लाख रुपयांची परतफेड हरिणखेडे यांनी यापूर्वीच केली होती. उर्वरित रकमेतील 60 हजार रुपये 7 मे रोजी देण्याचं ठरलं होतं. ते घेण्यासाठी जसबीर भाटीया हरिणखेडे यांच्या घरी गेले होते. संपूर्ण कर्ज आजच परत करा असा आग्रह सावकाराने हरिणखेडे यांच्याजवळ केला. यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात शाब्दीक खडाजंगी उडाली. तेव्हा जसबीरनं आपल्या गाडीत ठेवलेल्या बॉटलमधून पेट्रोल काढून अचानकपणे कल्पना हरिणखेडे आणि मुलगा पीयूष यांच्यावर शिंपडले आणि पेटवून दिलं. यात सावकार जसबीरही किरकोळ भाजला. या घटनेमुळं परिसरात एकच आरडाओरडा झाला. तेव्हा शेजारचे धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचवलं. घरात लागलेली आगही विझवण्यात परिसरातील नागरिकांना यश आले.

हे सर्व प्रकरण कर्ज घेतलेल्या पैशाच्या वादातून घडलं. हरिणखेडे यांनी कर्जाचे अर्ध्याहून अधिक पैसे परत केले होते. पण तरीही जसबीरनं त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या कल्पना आणि पीयूष हरिणखेडे यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना नागपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मृत्यूशी झुंज देत असतानाच कल्पना हरिणखेडे यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आता सावकार भाटिया यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपी सावकार सोनू भाटिया किरकोळ भाजला असून त्याच्यावर चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी सावकाराला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.