डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या, हत्येनंतर आरोपीची 26 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

भांडुप येथे प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीने डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या (Women murder Bhandup) केली. ही घटना काल (13 जानेवारी) भांडुप पश्चिम येथे सकाळी 11.40 ते 12 च्या दरम्यान घडली.

डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या, हत्येनंतर आरोपीची 26 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

मुंबई : भांडुप येथे प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीने डोक्यात रॉड घालून महिलेची हत्या (Women murder Bhandup) केली. ही घटना काल (13 जानेवारी) भांडुप पश्चिम येथे सकाळी 11.40 ते 12 च्या दरम्यान घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संशयीत आरोपीनेही आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यस्मिता साळुंखे असं मृत महिलेचं (Women murder Bhandup) नाव आहे.

ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचं बोललं जात आहे. आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर 26 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

भांडुप पश्चिम येथील वक्रतुंड सोसायटीमध्ये ही मृत महिला राहत होती. सकाळी 11.30 च्या दरम्यान आपल्या मुलाला शाळेत घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने मागून येऊन डोक्यात रॉड घालून तिची हत्या केली. यावेळी आरोपीने चेहऱ्यावर स्कार्फ लावला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेत असताना कल्पतरु क्रेस्ट, भांडूप पश्चिम या इमारतीच्या बेसमेंटमध्ये संशयित आरोपी जखमी अवस्थेत आढळला. त्याला मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किशोर सावंत असं या आरोपीचं नाव आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *