मनोरुग्ण मुलाकडून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार, आईचा जागीच मृत्यू

वयोवृद्ध जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाने कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना जालना (jalna boy killed mother father) जिल्ह्यात घडली आहे.

मनोरुग्ण मुलाकडून आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार, आईचा जागीच मृत्यू

जालना : वयोवृद्ध जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाने कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना जालना (jalna boy killed mother father) जिल्ह्यात घडली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी आहेत. दिलीप चव्हाण असे त्या मनोरुग्ण मुलाचे नाव आहे. तर ठकूबाई उत्तम चव्हाण असे मृत आईचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत (jalna boy killed mother father) आहे.

गोकुळवाडी तांडा येथे मोलमजुरी करणारे उत्तम घुमाजी चव्हाण (वय 70) आणि ठकूबाई उत्तम चव्हाण (वय 60) असे वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले आहेत. त्यातील एक मुलगा त्याचा सासुरवाडीला राहतो. तर दुसरा मुलगा शेजारी राहतो.तर तिसरा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण (वय 36) हा काहीसा मनोरुग्ण असून त्याच्या पत्नीने त्याला सोडले आहे.

उत्तम आणि ठकूबाई यांचा दुसरा मुलगा काही दिवसांपूर्वी उसतोडीच्या कामासाठी बाहेर गेला होता. गुरुवारी (2 जानेवारी) रात्रीचे जेवण झाल्यानंतर 9 च्या दरम्यान उत्तम चव्हाण आणि ठकूबाई चव्हाण झोपण्यासाठी गेले (jalna boy killed mother father) होते.

तेव्हा मुलगा दिलीप याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने आईवडिलांवर अमानुषपणे वार केले. या घटनेत आई ठकूबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील उत्तम चव्हाण गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर उपसरपंच कल्याण पवार, राजू राठोड, सुभाष चव्हाण, बाळू चव्हाण यांनी तात्काळ बदनापूर पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आई वडिलांवर वार करुन त्याच ठिकाणी बसलेल्या दिलीपला ताब्यात घेतलं. त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्या भरात त्याने हे कृत्य केले असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला (jalna boy killed mother father) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *