एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद : एमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीनने एका महिलेला नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केला असा आरोप करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच सय्यद मतीनची एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आली होती. एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. एका महिलेला नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे …

एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद : एमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीनने एका महिलेला नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केला असा आरोप करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच सय्यद मतीनची एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आली होती.

एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. एका महिलेला नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवत त्याने अत्याचार केल्याची तक्रार आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

रशीदपुरा येथील महिला कौटुंबीक कारणामुळे पतीपासून वेगळी राहते. आधार कार्ड बनवण्यासाठी ती एक वर्षापूर्वी नगरसेवक सय्यद मतीनच्या कार्यालयात गेली होती. मतीनने तिला आधार कार्ड बनवून नोकरी मिळवून देतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण केली. यानंतर तिच्याशी लगट लावून रशिदपुरा तसेच टाऊन हॉल परिसरातील घरात त्याने महिलेवर अत्याचार केला.

या प्रकाराची वाच्यता केल्यास त्याने ठार मारण्याचेही महिलेला धमकावले. त्यामुळे सुरुवातीला महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितले नाही. परंतु मतीनकडून लग्नास नकार मिळाल्याने तिने पोलीस आयुक्तालयात मतीनविरुद्ध बलात्काराच्या ओराप करुन तक्रार केली. या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सिटीचौक पोलीस ठाण्यात नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीदविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली.

विविध कारणांमुळे या नगरसेवकाची एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आली होती. महापालिकेत वंदे मातरम म्हणण्याला विरोध याच नगरसेवकाने केला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावालाही याच नगरसेवकाने विरोध केला होता. पक्षाची भूमिका नसतानाही वाद निर्माण केल्यामुळे या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केल्यांतर सय्यद मतीनला शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी चांगलाच चोप दिला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *