घरासमोर लघुशंका करताना रोखल्याने मुंबईत दाम्पत्यावर हल्ला, पतीचा मृत्यू

आरोपी अमित श्रीवास्तव घरासमोर लघुशंका करताना आढळल्यामुळे कनोजिया दाम्पत्याचा आरोपीसोबत वाद झाला होता

Mumbai Couple Attacked, घरासमोर लघुशंका करताना रोखल्याने मुंबईत दाम्पत्यावर हल्ला, पतीचा मृत्यू

मुंबई : घरासमोर लघुशंका करताना रोखल्याने मुंबईत दाम्पत्यावर हल्ला (Mumbai Couple Attacked) करण्यात आला. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील गोरेगाव भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे.

45 वर्षीय नंदलाल रामदेव कनोजिया पत्नी उर्मिलासह बाबासिंग चाळीत राहत. आरोपी अमित श्रीवास्तव गुरुवारी सकाळी त्यांच्या घरासमोर लघुशंका करताना आढळला. यावरुन कनोजिया दाम्पत्याचा आरोपीसोबत वाद झाल्याची माहिती मालाड पोलिसांनी दिली आहे.

खटके उडाल्यानंतर अमितने आपल्या मित्राला बोलावलं. त्यानंतर दोघांनी कनोजिया दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप होत आहे. हल्ल्यात नंदलाल कनोजिया यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी उर्मिला यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आरोपी अमित श्रीवास्तव विरोधात कलम 302 (हत्या) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्याही (Mumbai Couple Attacked) ठोकल्या आहेत.

फटाके फोडत असताना रहिवाशांवर गर्दुल्ल्यांचा हल्ला, 6 जण जखमी

ऐन दिवाळीत गर्दुल्ल्यांनी स्थानिकांवर हल्ला केल्याची घटना मीरा रोड परिसरात समोर आली होती. नशा करताना विरोध केल्यामुळे दोघा गर्दुल्ल्यांनी मीरारोडमधील काही रहिवाशांवर तलवारीने वार करत मारहाण केली होती. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *