'हिंदू'विरोधी फेसबुक पोस्टमुळे मुंबईतील डॉक्टरला बेड्या

मुंबई : फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट शेअर करत असल्याने मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे 38 वर्षीय डॉक्टरचे नाव आहेत. डॉ. सुनील कुमार निषाद यांच्यावर बुधवारी दुपारी मुंबईतील सत्र न्यायालयाच्या बाहेरुन अटकेची कारवाई करण्यात आली. धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात रवींद्र तिवारी …

'हिंदू'विरोधी फेसबुक पोस्टमुळे मुंबईतील डॉक्टरला बेड्या

मुंबई : फेसबुकवर सातत्याने हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट शेअर करत असल्याने मुंबईतील होमिओपॅथी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार निषाद असे 38 वर्षीय डॉक्टरचे नाव आहेत. डॉ. सुनील कुमार निषाद यांच्यावर बुधवारी दुपारी मुंबईतील सत्र न्यायालयाच्या बाहेरुन अटकेची कारवाई करण्यात आली.

धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात रवींद्र तिवारी नामक व्यक्तीने शनिवारी मुंबईतील विक्रोळीमधील पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आयपीसी कलम 295 (A) अंतर्गत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी आयपीसी कलम 295 (A) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.

डॉ. निषाद यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे रवींद्र तिवारी हे विक्रोळी भागातीलच रहिवाशी आहे. ते स्वत: सामाजिक कार्यकर्ते आहेत.

रवींद्र तिवारी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, विक्रोळीतील पार्कसाईट पोलिसांनी निषाद यांचा शोध सुरु केला होता. मात्र, बुधवारी डॉ. निषाद हे मुंबई सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल करण्यासाठी आले. मात्र, त्याआधी सत्र न्यायालयाबाहेरच पोलिसांनी त्यांना अटक केली.

दरम्यान, डॉ. सुनील कुमार निषाद हे गेल्या दोन वर्षांपासून हिंदू आणि ब्राह्मण विरोधी पोस्ट फेसबुकवर शेअर करत असल्याचा आरोप रवींद्र तिवारी यांनी केला आहे. सहा महिन्यांआधी सुद्धा तिवारी यांनी डॉ. निषाद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *