मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुटका, एकाला अटक

पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला (Mumbai Police Raid on sex racket dahisar) आहे.

Mumbai Police Raid on sex racket dahisar, मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुटका, एकाला अटक

मुंबई : पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला (Mumbai Police Raid on sex racket dahisar) आहे. दहिसरच्या गिरी निवास रावळपाडा येथे हा सेक्स रॅकेट सुरु होता. या रॅकेटमधून तीन मुलींची सुटका केली असून एका दलाला अटक करण्यात आली आहे. संजय गोविंदास असं अटक (Mumbai Police Raid on sex racket dahisar) करण्यात आलेल्या दलालाचं नाव आहे.

दहिसर येथील रावळपाडा येते ह्युमन ट्रॅफिकिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. तेव्हा तिथे त्यांना तीन मुली आढळून आल्या. त्यात दोन मुली या पश्चिम बंगालच्या असल्याची माहिती मिळाली. तर एक मुलगी ही बांगलादेशाची असल्याचे समजले. तिच्याकडे बांगलादेशाचा पासपोर्ट आणि व्हिसा मिळून आला.

या मुलींकडून वेश्या व्यवसाय केला जात होता. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा केला जात होता. पोलिसांनी मुलींची यातून सुटका केली असून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, मुंबई शहरात बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधून ह्युमन ट्रॅफिकिंग करुन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. यामाध्यमातून दलाल आर्थिक फायदा करुन घेतात. मुंबईमध्ये अनेक अनधिकृत धंदे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे अनेकवेळा समोर आलं आहे. त्यामध्ये सेक्स रॅकेट हा एक प्रमुख अनधिकृत धंदा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *