मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत 36 वर्षीय महिलेवर 24 वर्षीय तरुणाचा बलात्कार

मुंबईत 36 वर्षीय महिलेवर तिच्याच ओळखीतील 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे

मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत 36 वर्षीय महिलेवर 24 वर्षीय तरुणाचा बलात्कार

मुंबई : अनेक मोठे प्रशासकीय अधिकारी, राजकीय व्यक्ती राहत असलेल्या घाटकोपरमधील उच्चभ्रू सोसायटीत एका महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप केला जात आहे. 36 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी 24 वर्षीय आरोपीला अटक (Mumbai Vikroli Parksite Rape Case) केली आहे.

आरोपी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करतो. पीडित महिला ही त्याच्या ओळखीची आहे. शनिवारी रात्री लोअर परेलमधील एका हॉटेलमध्ये आरोपीने त्याचे मित्र आणि पीडित महिलेसह पार्टी केली. त्यानंतर घाटकोपरमधील संबंधित सोसायटीमध्ये राहणाऱ्या मित्राच्या घरी आरोपी पीडितेला घेऊन गेला.

मित्राचे कुटुंबीय परदेशी गेले होते. त्यामुळे सर्वांनी मित्राच्या घरीही रात्रभर पार्टी केली. याच दरम्यान आरोपीने आपल्याला
बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. यानंतर पहाटे आरोपी तिला मालाडमधील तिच्या घरी सोडण्यास गेला, त्यावेळी त्याने पीडितेला मारहाण केल्याचाही आरोप होत आहे.

जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या

पीडित महिलेने घरी जाऊन आपल्यासोबत घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तात्काळ मालाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. हा गुन्हा विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असल्याने तो वर्ग करण्यात आला. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी आरोपीला अटक (Mumbai Vikroli Parksite Rape Case) केली असून पुढील तपास सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *