लग्नपत्रिकेत नाव न घातल्याने पत्नीची हत्या, मुलगीही जखमी

कल्याण :  हल्ली एखादा व्यक्ती कोणत्या कारणावरुन रागाचं टोक गाठेल हे सांगता येत नाही. गुन्ह्याचं प्रमाण वाढलं असताना, गुन्ह्याची कारणंही आश्चर्यकारक आहे. ठाण्यातही असंच आश्चर्यकारक कारणावर हत्या झाली आहे.  मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव न घातल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ठाणकर पाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीची हत्या करुन आरोपी पती मोहन महाजन …

murder due to not name in marriage card in kalyan, लग्नपत्रिकेत नाव न घातल्याने पत्नीची हत्या, मुलगीही जखमी

कल्याण :  हल्ली एखादा व्यक्ती कोणत्या कारणावरुन रागाचं टोक गाठेल हे सांगता येत नाही. गुन्ह्याचं प्रमाण वाढलं असताना, गुन्ह्याची कारणंही आश्चर्यकारक आहे. ठाण्यातही असंच आश्चर्यकारक कारणावर हत्या झाली आहे.  मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव न घातल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

ठाणकर पाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीची हत्या करुन आरोपी पती मोहन महाजन पसार झाला. संतापजनक म्हणजे आरोपीने ज्या मुलीचं लग्न ठरलं आहे, त्या मुलीलाही जखमी केलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पती मोहन महाजन यांच्या मुलीचं लग्न ठरलं.  मात्र  मुलीच्या लग्नपत्रिकेवर नाव टाकण्यावरुन महाजन पती-पत्नीत वाद झाला. या वादातून मोहन यांनी स्वत:च्या पत्नीची हत्या केली. शिवाय मुलीलाही जखमी केलं. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर पती मोहन महाजन फरार आहे. सध्या बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *