परभणीत शिवसेना नगरसेवक अमर रोडेंची हत्या

परभणी : शहरातील जायकवाडी परिसरात शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. संबंधित नगरसेवकाचे नाव अमरदीप रोडे असे आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची मध्यरात्री कुऱ्हाडी तीक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून हत्या …

Shivsena, परभणीत शिवसेना नगरसेवक अमर रोडेंची हत्या

परभणी : शहरातील जायकवाडी परिसरात शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. संबंधित नगरसेवकाचे नाव अमरदीप रोडे असे आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची मध्यरात्री कुऱ्हाडी तीक्ष्ण हत्यार व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही निर्घृण हत्या बघून परभणी जिल्हा हादरून गेला आहे. परभणीत शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून अमरदीप रोडे यांच्याकडे बघितले जात होते, परंतु त्यांची हत्या ही राजकीय पार्श्वभूमीवर झाली की गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हे मात्र अद्याप कळलेले नाही.  अमरदीप रोडे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही हत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर झालेली आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो.

पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला असून रोडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येनंतर या हत्येत सहभागी असणारे २ आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनीही किरकोळ कारणातून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या या हत्येमागे राजकीय कारण आहे की अन्य काही हे मात्र तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये माजी नगरसेवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यातच आज परभणीतही झालेल्या शिवसेना नगरसेवकांच्या हत्येने बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या घटनांमुळे लोकसभा निवडणुकीत मराठवाडा रक्तरंजित निवडणुकीकडे वळतो की काय अशीही शंका व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न निर्माण होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *