आधी पत्र, मग खंडणीचा फोन, डॉक्टर दाम्पत्याला जीवेमारण्याची धमकी

आधी पत्र, मग खंडणीचा फोन, डॉक्टर दाम्पत्याला जीवेमारण्याची धमकी

नागपूर : डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना नागपुरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपिंना ताब्यात घेतले आहे. नागपुरात डॉक्टर चौधरी यांचं क्लिनिक आहे. ते सर्जन आहेत. तर, त्यांच्या पत्नींची पॅथॉलॉजि लॅब आहे. गेल्या 9 फेब्रुवारीला त्यांच्या घरी एक पत्र आलं. त्यात “तुम्हाला तुमच्या मुलांची आणि स्वतःच्या जीवाची काळजी असेल तर 50 लाख तयार ठेवा”, अशी धमकी देण्यात आली होती. याची माहिती डॉक्टर दाम्पत्यांनी पोलिसांना दिली. पोलीसांनी या घटनेची गंभीरता ओळखून हे पत्र कुणी आणि का पाठवले असावे याचा तपास करण्यास सुरुवात केली. त्यासोबतच खंडणीखोर फोन करतात का याचीही वाट पोलिसांना होती. अखेर 11 फेब्रुवारीला खंडणीसाठी फोन आला. खंडणीखोरांनी पत्र वाचलं की, नाही अशी विचारणा केली. तसेच खंडणीची पैसे तयार ठेवण्यास सांगितले.

पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली आणि ज्या नंबर वरुन फोन आला त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या व्यक्तिला विचारपूस केली, तेव्हा ज्या नंबरवरुन फोन आला होता तो नंबर दुसऱ्याकडे असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांना त्या व्यक्तीची माहिती मिळवली. त्यानंतर मोमीनपुरा भागातून खंडणीखोराला अटक करण्यात आली.

आरोपी राधेशाम सरकार हा डॉक्टर चौधरी यांच्या पत्नीच्या पॅथॉलॉजि लॅबमध्ये काम करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. त्याला डॉक्टर परिवाराची इतंभूत माहिती होती. त्याने ही माहिती त्याच्या ओळखिच्या मंगेश उईके याला दिली. त्यानंतर मंगेशने डॉक्टरला पत्र लिहिलं आणि ते पत्र डॉक्टर चौधरींच्या घरी पाठवलं, त्यानंतर मंगेशचा मित्र मोहसीन खान आणि फिरोज खान याला त्यांनी डॉक्टर चौधरींना फोनवर धमकी दिली. सध्या पोलिसांनी या आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *