पत्नीचा राग मेहुणीच्या बाळावर, एक महिन्याच्या चिमुरडीची भोसकून हत्या

पत्नीसोबत झालेल्या वादाच्या रागातून नागपुरात 41 वर्षीय पतीने आपल्या मेहुणीच्या बाळाची हत्या केली. अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले

पत्नीचा राग मेहुणीच्या बाळावर, एक महिन्याच्या चिमुरडीची भोसकून हत्या

नागपूर : नागपुरातील दाम्पत्यामधला वाद महिलेच्या भाचीच्या जीवावर उठला. पत्नीसोबत असलेल्या वादातून आरोपीने मेहुणीच्या एक महिन्याच्या बाळाची हत्या (Nagpur Baby Murder) केली. 41 वर्षीय आरोपी गणेश गोविंद बोरकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नागपुरातील पारशिवणी पोलिस स्टेशन अंतर्गत बाखरी (पिपळा) गावात हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीने एक महिन्याच्या बाळाची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली. रुपाली जितेंद्र पांडे यांच्या चिमुरडीचं नाव ठेवण्याआधीच नियतीने घात केला.

आरोपी गणेश गोविंद बोरकर हा कुही गावातील रहिवासी आहे. गणेश आणि त्याच्या पत्नीचे काही कारणामुळे खटके उडत होते. त्यामुळे पत्नी बाखरीमध्ये असलेल्या आपल्या माहेरी निघून आली होती.

पत्नी आपल्यासोबत नांदायला तयार नाही, या रागातून गणेश सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी तिच्या माहेरी आला. सासरच्या मंडळींसोबत त्याचा वाद झाला. पत्नीसह सासरच्या मंडळींना त्याने शिवीगाळ केली.

वादावादी सुरु असतानाच गणेशने धारदार शस्त्र काढलं आणि शेजारीच पाळण्यात झोपलेल्या एक महिन्याच्या रुपालीवर सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की, बाळाच्या पोटातील आतडं बाहेर आलं.

चिमुरडीला गंभीर जखमी अवस्थेत कन्हानमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला नागपूरच्या मेये रुग्णालयात पाठवलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *