मायलेकाची बत्त्याने ठेचून हत्या, बिहारहून आलेल्या मदतनीसावर संशय

नागपुरात मायलेकाची बत्त्याने ठेचून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मदतनीस म्हणून सोबत राहणाऱ्या तरुणाने चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय आहे

मायलेकाची बत्त्याने ठेचून हत्या, बिहारहून आलेल्या मदतनीसावर संशय

नागपूर : नागपुरात मायलेकाची (Nagpur Double Murder) बत्त्याने ठेचून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाडेकरु म्हणून राहणाऱ्या शाहू कुटुंबासोबत मदतनीस असलेल्या बिहारी तरुणाने मायलेकाचा जीव घेतल्याचा संशय आहे. 25 वर्षीय महिला आणि तिच्या चार वर्षीय मुलाच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात स्वामी विवेकानंद चौकाजवळ नारायण वानखेडे यांच्या घरी शाहू कुटुंब भाड्याने राहत होतं. मूळ बिहारचे असलेले दिनेश शाहू हे 25 वर्षीय पत्नी प्रियांका आणि चार वर्षांचा मुलगा अंशुल यांच्यासह राहत होते. गेल्या 15 दिवसांपासून मूळ बिहारचा असलेला रवी नावाचा तरुण शाहू कुटुंबासोबत राहायला आला होता.

दिनेश यांच्या घरी गणपती असूनही अंधार दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा उघडून पाहिलं, तेव्हा प्रियांका आणि अंशुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. जवळच रक्ताने माखलेला बत्ताही आढळला.

पती दिनेश यांना पत्नी आणि मुलाच्या हत्येच्या बातमीने जबर धक्का बसला. त्याचप्रमाणे रवी बेपत्ता असल्यामुळे त्यानेच हत्या केल्याचा संशय आहे. पती दिनेश यांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *