कारचालकाच्या कृत्याचा कहर, वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं

नागपूर सक्करदरा चौकातील सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. Nagpur Traffic Police Were Taken From The Bonnet Of a Car; Video Goes Viral

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 12:50 PM, 30 Nov 2020

नागपूर : नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपूर सक्करदरा चौकात हा सिनेस्टाईल थरार घडल्यानं एकच खळबळ उडाली. (Nagpur Traffic Police Were Taken From The Bonnet Of a Car; Video Goes Viral)

ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडला आहे. कार चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्नही केला, पोलिसांनी प्रसंगावधान राखत बोनेटवरून उडी घेतल्यानं त्याचा थोडक्यात जीव बचावला. चालकाने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आकाश चव्हाण असे कार चालकाचे नाव असून, अमोल चिदमवर असे बोनेटवरून फरफटत नेण्यात आलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. नागपुरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न आणि कारच्या बोनेटवर फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नागपूर सक्करदरा चौकातील सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय. या प्रकरणातील आरोपी आकाश चव्हाणवर आधीही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिली आहे.

तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा कडक इशारा दिला आहे. नागपूरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न आणि कारच्या बोनेटवर फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नागपूर सक्करदरा चौकातील सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. राज्यात पोलिसांवर हल्ला करण्याचे किंवा अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाही,  कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Nagpur Traffic Police Were Taken From The Bonnet Of a Car; Video goes viral

संबंधित बातम्या

रुग्ण दगावल्याचा राग, नातेवाईकांकडून दोन दिवसांनंतर दवाखान्यावर दगडफेक

प्रवासी ट्रॅव्हल्समधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक, सापळा रचत 61 लाखांचा मुद्देमाल हस्तगत