नांगरे पाटलांनी बनवलेल्या गस्ती पथकातील महिला पोलिसांचीच छेड, आरोपींना इंगा

रात्रीच्या सुमारास गस्त घालण्यासाठी तयार केलेल्या विशेष पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची छेड काढल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik women police molestation) उघडकीस आला आहे.

Nashik women police molestation, नांगरे पाटलांनी बनवलेल्या गस्ती पथकातील महिला पोलिसांचीच छेड, आरोपींना इंगा

नाशिक : रात्रीच्या सुमारास गस्त घालण्यासाठी तयार केलेल्या विशेष पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची छेड काढल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik women police molestation) उघडकीस आला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांच विशेष पथक तयार केलं आहे. मात्र या पथकातील महिला पोलिसांचीच छेड काढण्यात आली. छेड काढणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं (Nashik women police molestation) आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांची छेडछाड करतानाचा व्हिडीओ दुसऱ्या एका छुप्या पथकाने रेकॉर्ड केला आहे. याद्वारे छेडछाड करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या वेळेस गस्त घालण्यासाठी महिला पोलीस साध्या वेशात फिरणार असल्याचा निर्णय पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष महिला पोलिस कर्मचाऱ्यांची पाच पथक तयार केली आहेत. या पथकातील महिला पोलिस नाशिक शहर परिसरात 24 तास गस्त घालत असतात.

या पथकापैकी एका पथकातील महिला पोलीस काल (23 नोव्हेंबर) पंचवटी परिसरात गस्त घालत असताना, एका पथकातील महिला पोलिसाची छेड काढली. त्यावेळी दुसऱ्या एका पथकाने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडीओनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं (Nashik women police molestation) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *