शेजाऱ्यांनी चावी ठेवली, पुण्यातील शेजारणीने रोज घरात मारला डल्ला

शेजारणीनेच बनावट चावीच्या सहाय्याने घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला (pune neighbour theft) आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

pune neighbour theft, शेजाऱ्यांनी चावी ठेवली, पुण्यातील शेजारणीने रोज घरात मारला डल्ला

पुणे : शेजारणीनेच बनावट चावीच्या सहाय्याने घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला (pune neighbour theft) आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरी करणाऱ्या दोन महिलांना वनवाडी पोलिसांनी अटक केली आहे. भारती भगवान असवानी (वय 60) आणि सुवर्णमला बूथवेल खंडागळे (वय 59) अशी चोरी करणाऱ्या महिलांची नावं (pune neighbour theft) आहेत.

पुण्यात एका महिलेने आपल्या शेजारच्यांकडे घराची चावी ठेवली होती. यावेळी शेजारणीने त्या चावीची बनवाट चावी तयार केली. त्यानंतर मैत्रिणीच्या मदतीने वेळोवेळी घरात चोरी केली. यामध्ये तिने लाखो रुपयांची चोरी केली आहे. सपना जिग्नेश शहा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी एकाच ठिकाणी जवळजवळ राहत होते. जेव्हा फिर्यादी बाहेर जायचा तेव्हा आरोपी असवानीकडे घराची चावी द्यायचा. यावेळी आरोपी आसवानी यांनी बनवाट चावी तयार केली आणि शहा कुटुंबीय बाहेरगावी जायचे तेव्हा आसवानी घरात बनवाट चावीच्या सहाय्याने चोरी करायची.

चोरीच्या घटना जून 2018 ते फेब्रुवारी 2020 या काळात अनेकदा घडल्या होत्या. आतापर्यंत घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकून सात लाख 42 हजार रुपये चोरीला गेले आहेत.

सीसीटीव्हीद्वारे आरोपीला अटक

घरात सतत चोरी होत असल्याने शहा कुटुंबीयांनी बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला आणि त्याचा अॅक्सेस त्यांनी मोबाईलवर घेतला. यावेळी शहा यांनी आम्ही मुंबईला जात असून घरावर लक्ष ठेवा असं शेजारच्या आसवानी यांना सांगितले. पण शहा कुटुंब मुंबईला न जाता ते पुण्यातील आपल्या जवळच्या फ्लॅटमध्ये राहण्यास गेले. त्यानंतर शेजारच्या आसवानी यांनी बनवाट चावीने शहा यांचे घर उघडून कपाटात शोधाशोध करत असल्याचे समोर आले. यानंतर तातडीने शहा यांनी घराकडे जात आसवानी यांना रंगेहात पकडले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *