निर्भयाच्या आरोपींच्या फाशीची तयारी पूर्ण, फाशीपूर्वीचे 24 तास महत्त्वाचे

देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना 1 फेब्रुवारीला अखेर फासावर लटकवलं जाणार आहे

Nirbhaya gang rape, निर्भयाच्या आरोपींच्या फाशीची तयारी पूर्ण, फाशीपूर्वीचे 24 तास महत्त्वाचे

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना 1 फेब्रुवारीला अखेर फासावर लटकवलं जाणार आहे (Death penalty to accused of nirbhaya rape case). या प्रकरणातील चारही दोषींना शनिवारी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येईल. दिल्ली कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे.

फाशीच्या पूर्वीचे 24 तास महत्त्वाचे

फाशीच्या पूर्वीचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असतात. कागदपत्रांची तपासणी करुन कारागृहाच्या मॅन्युअलनुसार फाशी देण्यात येते. आरोपीच्या वजनानुसार फाशीचा दोरखंड असतो. फाशीच्या दहा दिवसांपूर्वीपासूनच याची तयारी केली जाते. आरोपीच्या वजनाच्या मातीच्या पोत्यांना फाशी देऊन सराव केला जातो. तुरुंगातील कर्मचाऱ्यांसाठी हा तणावाचा प्रसंग असतो. आरोपीचं मनोबल खच्चीकरण झालेले असते. कर्मचाऱ्यांचंही मनोबल वाढवावं लागतं, अशी माहिती निवृत्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी दिली.

फाशीच्या काही तासांपूर्वी पवन गुप्ताची सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका

निर्भया प्रकरणातील आरोपी अक्षय ठाकूरची दया याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर आता आरोपी पवन गुपताने फाशीच्या काही तासांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुन्ह्यावेळी अल्पवयीन असल्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं होतं, पवन गुप्ताने या निर्णयावर पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. तसेच, डेथ वॉरंटला रद्द करण्याची मागणीही केली आहे. यापूर्वी 20 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताच्या याचिकेला फेटाळलं होतं. या याचिकेत पवन गुप्ताने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता.

एकाच वेळी चौघांनाही फाशी

यापूर्वी 22 जानेवारीला सकाळी सात वाजता निर्भयाचे चारही मारेकरी फासावर लटकवलं जाणार होतं. मात्र त्यानंतर दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली (Death penalty to accused of nirbhaya rape case) होती. त्यानुसार अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल.

जेल नंबर तीनमध्ये चौघाही दोषींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील जल्लाद चौघांना एकामागून एक फासावर लटकवेल. या कुटुंबात पिढ्यान् पिढ्या हेच काम केले जाते. मात्र, निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवणारी व्यक्ती पहिल्यांदाच जल्लाद म्हणून काम करणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरण

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *