धनंजय मुंडेंच्या समर्थकाच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या झाली आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. 24 तासात बीड जिल्हा दोन हत्यांनी हादरला आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. …

beed murder, धनंजय मुंडेंच्या समर्थकाच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येनंतर 24 तासात बीडमध्ये आणखी एक हत्या झाली आहे. अजय भोसले या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. 24 तासात बीड जिल्हा दोन हत्यांनी हादरला आहे.

अजय भोसले या तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. खळबळजनक म्हणजे, पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येशी अजय भोसले हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे दोन्ही हत्यांचे गूढ वाढले आहे.

पांडुरंग गायकवाड हत्या

परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती पांडुरंग गायकवाड यांची ओव्हर ब्रिजच्या खाली धारदार शस्त्राने हत्या झाली. पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पांडुरंग गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे या घटनेला आणखी महत्त्वं आलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात राजकारणाशी संबंधित व्यक्तीची हत्या झाल्याने, बीडसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या कट्टर समर्थकाची निर्घृण हत्या

दरम्यान, पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी 6 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हत्येमागे भाजप कार्यकर्त्याचा हात : धनंजय मुंडे

पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येत भाजप कार्यकर्त्याचा हात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.  पाणी वाटपावरून पांडुरंग गायकवाड यांची हत्या झाल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *