सावधान! मॉन्स्टरवरुन नोकरीच्या आमिषाने तरुणाला लुटलं

मुंबई : परदेशात जॉब देतो असे सांगून तरुणांना फसवाणाऱ्या एका इसमाला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. परदेशात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी देतो असे सांगत, तरुणांकडून लाखो रुपये उकळले जात होते. पायधुनी पोलिस याचा अधिक तपास करत आहेत. शम्स पठाण हा तरुण उच्च शिक्षीत आहे. त्यासोबतच त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला आहे. तसेच त्याने काही …

सावधान! मॉन्स्टरवरुन नोकरीच्या आमिषाने तरुणाला लुटलं

मुंबई : परदेशात जॉब देतो असे सांगून तरुणांना फसवाणाऱ्या एका इसमाला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. परदेशात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी देतो असे सांगत, तरुणांकडून लाखो रुपये उकळले जात होते. पायधुनी पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

शम्स पठाण हा तरुण उच्च शिक्षीत आहे. त्यासोबतच त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला आहे. तसेच त्याने काही वर्ष दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये काम केले आहे. पण पठाण त्या नोकरीने खुश नसल्याने त्याला परदेशात चांगल्या पगाराची नोकरी हवी होती. यामुळे त्याने आपला बायोडेटा मॉन्स्टर (Monster.com) या वेबसाईटवर अपलोड केला. दुसऱ्या दिवशी पठाणला कॉल आला आणि ऑनलाईन पद्धतीने मुलाखतही झाली.

यानंतर या भामट्या टोळींनी पठाणला जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलचं अपॉईंटमेंट लेटर सुद्धा मेल केलं. मात्र प्रत्येकवेळी परीक्षा आणि मेडिकल टेस्टच्या नावे पैसे पाठवण्यास सांगत राहिले. काही कालांतराने त्यांची मागणी वाढू लागल्याने पठाण याने हॉटेलच्या एच. आर. डिपार्टमेंटला संपर्क साधला तेव्हा पठाणला कळाले की, ज्या पोस्टसाठी त्याच्याकडून पैसे आकारले जात आहे अशी कोणतीही पोस्ट हॉटेलमध्ये नाही.

आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे पठाणला कळ्यानंतर त्याने थेट पायधुनी पोलीस स्टेशन गाठलं आणि अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली. पायधुनी पोलिसांनी आयटी अॅक्टद्वारे गुन्हा नोंद करुन अधिक तपास सुरु केला आहे.

तुमच्यासोबतही अशी घटना घडू शकते. यासाठी ऑनलाईन नोकरी वेबसाईटवरुन जर पैशांची मागणी केली तर सावधना, चुकूनही असे पैसे ट्रान्सफर करु नका.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *