आर्मी ऑफिसरचे नाव सांगून OLX वेबसाईटवर ग्राहकांची फसवणूक

तुम्ही जर ऑनलाईन वस्तू विकत घेत असाल तर सावध राहा. सध्या OLX या वेबसाईटवर आर्मी कर्मचारी (OLX website fraud) असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे.

आर्मी ऑफिसरचे नाव सांगून OLX वेबसाईटवर ग्राहकांची फसवणूक

मुंबई : तुम्ही जर ऑनलाईन वस्तू विकत घेत असाल तर सावध राहा. सध्या OLX या वेबसाईटवर आर्मी कर्मचारी (OLX website fraud) असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. मुंबईतील भायखळा येथे राहणाऱ्या एका तरुणाची 20 हजार रुपयांची फसवणूक (OLX website fraud) केली आहे.

OLX वेबसाईटवरुन कॅमेरा विकत घेत असताना एका व्यक्तीने मी आर्मी कर्मचारी आहे. आर्मी कॅन्टीनमधून कॅमेरा देतो असे सांगून 20 हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही कॅमेरा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळताच भूषण सोनावणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.

भूषण हा एक प्रोफेशनल कॅमेरामन आहे. त्याला त्याच्या कामासाठी एक कॅमेरा हवा होता म्हणून त्यांनी olx वर स्वस्त कॅमेरा घेण्याच ठरवलं आणि शोध सुरु केला. olx वर विक्रम नावाच्या व्यक्तीशी त्याचं या संदर्भात बोलणं झालं. विक्रमने स्वतःला आर्मी अधिकारी म्हणून भासवून भूषणचा विश्वास संपादन केला आणि त्याच्या कडून टप्या टप्प्याने एकूण 20 हजार रुपये घेतले.

लोकांमध्ये आर्मीबद्दल आदर आणि प्रेम आहे. याचाच फायदा सध्या काही भामटे घेत आहेत. आर्मी कर्मचारी भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वेगवेगळ्या राज्यात बसून देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात कोणालाही हे भामटे फसवत आहेत. विशेष म्हणजे आर्मी कर्माचारी म्हणून लोक सहज यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत.

काही दिवसांपूर्वी माटुंगा पोलिसांनी अश्याच एका भामट्याला राजस्थानमधून अटक केली होती. ज्याने माटुंगा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला गाडी विकतो म्हणून त्याच्याकडून सहा लाख रुपये घेतेले होते. पण गाडी विकली नव्हती. तर भायखळा येथे राहणाऱ्या भूषणसोबत सुद्धा असाच प्रकार घडला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *