मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पालघर : मुंबई-अहमदाबाद मार्गावर सेल्फी ढाब्यावर चाललेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. परराज्यातील मुली आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांचे गुन्हे पथक आणि वालीव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सेल्फी ढाबा आहे. या ढाब्याच्या दर्शनीय …

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पालघर : मुंबई-अहमदाबाद मार्गावर सेल्फी ढाब्यावर चाललेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. परराज्यातील मुली आणून या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांचे गुन्हे पथक आणि वालीव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सेल्फी ढाबा आहे. या ढाब्याच्या दर्शनीय भागावरच चक्क खुलेआम तेथील रूमचा दर लिहिला आहे. 600 रुपयात 1 तास असे लिहून ठेवले आहे. अनैतिक संबंध असणाऱ्या जोडप्यांना या ठिकाणी रूम सर्रास दिल्या जात होत्या.

मुंबई आणि आजूबाजूच्या आंबट शौकिनासाठी चक्क हायप्रोफाईल 18 ते 25 वयोगटातील मुलीही पुरविल्या जात होत्या. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या चार पीडित मुली आहेत. या चारही मुली 20 ते 25 वयोगटातील आहेत. अशा मुलींकडून या ठिकाणी पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेतला जात होता.

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना याची माहिती मिळाल्याच्या नंतर त्यांनी त्यांचे गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वालीव पोलीस यांनी संयुक्त छापा मारून मुलींची सुटका केली. या छाप्यात मिळालेल्या चार पीडित मुलींपैकी एक बांगलादेशी, एक कलकत्ता आणि दोन इतर राज्यातील आहेत. यासोबत हॉटेल मॅनेजर, एक दलाल आणि इतर सहा असे आठ आरोपीही ताब्यात घेतले आहेत. या सर्वांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठमोठे हॉटेल, ढाबे आहेत. सेल्फी ढाबा मालकाने तर चक्क रूमचा एक तासांचा दर दर्शनीय ठिकाणी लावून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू केला होता. या ठिकाणी एकूण 17 रूम आहेत. त्या ठिकाणी कोणतेही ओळखपत्र न घेता रूम दिल्या जात असल्याचं तपासात उघड झालंय. छाप्यात पोलिसांना बांगलादेशी, कलकत्ता येथील पीडित मुली सापडल्या आहेत. आता या मुली कशा, कुठून आणल्या जात होत्या, आणखी यात कोणकोण सामील आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *