पुण्यात लाचखोरीत पोलीस अव्वल, दुसऱ्या नंबरवर...

पुणे विभागात लाचखोरीत पोलीस प्रशासन अव्वलस्थानी आहेत. पोलीसांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील वर्षी लाच घेतल्याप्रकरणी सर्वाधिक 184 कारवाया पुणे विभागात केल्या.

Pune Police Corruption, पुण्यात लाचखोरीत पोलीस अव्वल, दुसऱ्या नंबरवर…

पुणे : पुणे विभागात लाचखोरीत पोलीस प्रशासन अव्वलस्थानी आहेत (Police Found Most Corrupt). पोलीसांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभाग आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील वर्षी लाच घेतल्याप्रकरणी सर्वाधिक 184 कारवाया पुणे विभागात केल्या. त्यापैकी सर्वाधिक कारवाया या पोलिसांविरोधात आहेत. पोलिसांविरोधात 78 प्रकणांत कारवाई करण्यात आली. तर त्यापाठोपाठ महसूल विभागात सर्वाधिक लाचखोर असल्याचं समोर आलं आहे (Pune Police Corruption). लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागात 58 अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली.

गेल्या वर्षात म्हणजेच 2019 मध्ये लाच घेतल्याप्रकरणी पुणे विभागात 184 कारवाया करण्यात आल्या. यामध्ये पोलीस 78, महसूल 58, जिल्हा परिषद 21 तर मनपा आणि जमीन नोंदणी विभाग 11 कारवाया झाल्यात. राज्यातील सर्वाधिक कारवाया या पुणे परिक्षेत्रात झाल्या. विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुणे एसीबीला ‘बेस्ट रेंज रिवार्ड’ने गौरवण्यात आलं.

या कारवाईत 261 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये क्लास वनची 11, क्लास टू चे 18, क्लास थ्रीचे 158 क्लास फोरचे 15 या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2020 पर्यंत 28 कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या चारने वाढली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *