डीएसकेंच्या नावे सुसाईड नोट, पुण्यात ठेवीदाराची आत्महत्या

सहा वर्षांनंतरही डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने 60 वर्षीय तानाजी कोरकेंनी टोकाचं पाऊल उचललं.

डीएसकेंच्या नावे सुसाईड नोट, पुण्यात ठेवीदाराची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 10:46 AM

पुणे : ‘डीएसकें’कडे गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे पुण्यात ठेवीदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 60 वर्षीय तानाजी गणपत कोरके यांनी राहत्या घरी आयुष्य संपवलं (Pune DSK Depositor Suicide).

तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडीमधील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलींच्या लग्नासाठी डी. एस. कुलकर्णी अर्थात ‘डीएसके’मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र सहा वर्षांनंतरही हे पैसे परत न मिळाल्याने कोरकेंनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘माझ्या आत्महत्येला डीसएकेंना जबाबदार धरा, त्यांची पोलिस चौकशी करा’ अशी मागणी केली आहे.

तानाजी कोकरे यांनी 2014 मध्ये आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावे चार लाख तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावे पन्नास हजार रुपये रक्कम डीएसके डेव्हलपर्स यांच्याकडे गुंतवणूक केली होती. 2017 मध्ये त्याची मुदत संपल्यावर रकमेसाठी त्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.

तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी पैसे उधार घेतले. मात्र चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे? याची चिंता कोकरे यांना लागली होती. या चिंतेतून त्यांनी आयुष्य संपवत असल्याचं सुसाईड नोटमध्ये (Pune DSK Depositor Suicide) लिहिलं आहे.

डीएसके ग्रुपने ज्यादा व्याजाचे अमिष दाखवून राज्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. या प्रकरणी डीएसके, त्यांची पत्नी, मुलगा आणि काही नातेवाईकत सध्या तुरुंगात आहेत.

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.