अण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग

28 वर्षीय महिला होमगार्डच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी उत्तमी साळवीला अटक केली आहे

Pune Police Molestation, अण्णा नाईक-शेवंताचे मिठीतील फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर, होमगार्डकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग

पुणे : पुण्यात होमगार्डने आक्षेपार्ह फोटो पाठवून महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता या व्यक्तिरेखांचे मिठीतील फोटो पाठवून होमगार्डने विनयभंग केल्याचा आरोप (Pune Police Molestation) आहे.

होमगार्ड पुणे शहर समुपदेशक उत्तम शिवाजी साळवी याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. 28 वर्षीय महिला होमगार्डने साळवीविरोधात फिर्याद दिली होती.

तक्रारदार महिला होमगार्ड फुलेनगर येथील कार्यालयाअंतर्गत कार्यरत होती. तर आरोपी उत्तम साळवी हा शहर समुपदेशक म्हणून काम करतो. मार्च 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत आरोपी वारंवार तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवून वैयक्तिक परिचय वाढवण्याचा प्रयत्न करत होता.

तक्रारदार महिला कार्यालयात काम करत असताना आरोपी तिच्याकडे वाईट नजरेने वारंवार पाहत असे. माझ्याबरोबर फिरायला चल, असं सांगत माझ्या मनाप्रमाणे वागली नाहीस, तर तुला कामावरुन काढून टाकेन अशी धमकीही देत असल्याचा आरोप आहे.

साळवीने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधील अण्णा नाईक आणि शेवंता यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीचं छायाचित्र तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर पाठवलं. त्याच्या खाली ‘प्रेमाला वय नसतं’ असा मेसेजही लिहिला होता.

या त्रासाला कंटाळून तक्रारदार महिला होमगार्डने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक (Pune Police Molestation) करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *