मुंबईत दुपटीने बलात्कार वाढले, RTI ची धक्कादायक माहिती

मुंबई: राजधानी दिल्लीपेक्षा मुंबई हे अत्यंत सुरक्षित शहर मानलं जातं. मुंबई पोलिसांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होते. एकीकडे असं चित्र असताना, दुसरीकडे मुंबई पोलिसांचा मुंबईवरील वचक सुटत चालला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मुंबईत महिलांवरील अत्याचारात चार वर्षात दुपटीने वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अत्याचार किंवा …

मुंबई: राजधानी दिल्लीपेक्षा मुंबई हे अत्यंत सुरक्षित शहर मानलं जातं. मुंबई पोलिसांची ख्याती जगप्रसिद्ध आहे. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होते. एकीकडे असं चित्र असताना, दुसरीकडे मुंबई पोलिसांचा मुंबईवरील वचक सुटत चालला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मुंबईत महिलांवरील अत्याचारात चार वर्षात दुपटीने वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अत्याचार किंवा बलात्काऱ्यांना मुंबई पोलिसांचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई पोलिसांनी आरटीआयमध्ये दिलेली माहिती धक्कादायक आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांना दिलेल्या माहितीत, 2013 च्या तुलनेत 2017 मध्ये बलात्काऱ्यांच्या घटनांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाल्याचं नमूद आहे. तर 2018 मध्ये तब्बल 842 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

2013 पासून सप्टेंबर 2018 पर्यंत तब्बल 3817 बलात्कार गुन्ह्यांची नोंद

2013 मध्ये एकूण 388 बलात्कार

2014 मध्ये एकूण 605 बलात्कार

2015 मध्ये एकूण 710 बलात्कार

2016 मध्ये एकूण 712 बलात्कार

2017 मध्ये एकूण 751 बलात्कार

2018 सप्टेंबरपर्यंत एकूण 651 बलात्कार

अल्पवयीन मुलींवर अत्याचार 

2017 सप्टेंबरपासून डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 289 अल्पवयीन मुलींवर बलात्कार गुन्ह्यांची नोंद आहे.

2018 सप्टेंबरपर्यंत एकूण 842 अल्पवयीन मुलींवर बलात्कार गुन्ह्यांची नोंद

सप्टेंबर 2017 पूर्वीची माहिती मुख्य संगणक कक्षात उपलब्ध नाही

महिलांवर अत्याचार होऊ नये म्हणून अनेक कडक कायदे आहेत. मात्र तरीदेखील बलात्कारांसारख्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ अत्यंत चिंतेची बाब आहे. याबाबत प्रशासनांनी योग्य ते पाऊल लवकर उचलावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

“महिलांवर अत्याचार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन गंभीर असून, योग्य ती कारवाई सतत केली जात आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक कायदे केले आहेत. आरटीआयमार्फत जी माहिती समोर आली आहे, ती अत्यंत चिंताजनक आहे. याबाबत  गुन्हे विभागातर्फे सखोल माहिती घेतल्यानंतर विधान केलं जाईल”, असं उत्तर मुंबई पोलिसांच्या संबंधित विभागातर्फे देण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *