उस्मानाबादेत अनाथ विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 शिक्षक, शिपायावर गुन्हा 

उस्मानाबादेत अनाथ विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 शिक्षक, शिपायावर गुन्हा 

उस्मानाबाद: नात्याला काळिमा फासणारी घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. मावशीच्या नवऱ्याने तसंच शाळेतील तीन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यात घडली. धक्कादायक म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अनाथ आहे.   याप्रकरणी लोहारा पोलिसात 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 1 आरोपी फरार आहे. मावशी नवरा फरार असल्याचं कळतंय.

पीडित मुलगी लोहारा तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत शिकते. बलात्कार करणाऱ्यांमध्ये तीन शिक्षक, एक शिपाई, कृषी विभागाचा कर्मचारी, असे 5 जण असून पीडीत मुलीच्या मावशीच्या नवऱ्याच्याही आरोपीमध्ये समावेश आहे.

हे सर्व नराधम 2013 सालापासून मुलीवर अत्याचार करीत होते, असा आरोप आहे. आरोपी विक्रम काजळे, सुयश जोशी, जयराम मोरे, नागनाथ कोकाटे, दत्ता जमदाडे आणि विजय तोडकर यांच्यावर गुन्हा नोंद असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपींना आज उमरगा कोर्टात हजर केले जाणार आहे.

तब्बल 5 वर्षांपासून मुलीवर अत्याचार सुरु होते, अशी माहिती समोर येत आहे. शिक्षक आणि शिपायांचं या कृत्याचा फटका आणखी किती मुलींना बसला आहे, हे गुलदस्त्यात आहे. पोलीस सध्या तपास करत असून, या शिक्षण संस्थेतील आणखी कोणी मुली बळी ठरल्या आहेत का त्याचा तपास सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *