वासनांधतेचा कळस, कॉन्स्टेबलचा टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार, टॅक्सी वेश्या वस्तीत न नेल्याने कृत्य

आरपीएफ कॉन्स्टेबलने चक्क टॅक्सीचालकावर जबरदस्ती करत, अनैसर्गिक कृत्य केल्याचा (constable rape on taxi driver) आरोप आहे.

वासनांधतेचा कळस, कॉन्स्टेबलचा टॅक्सीचालकावर अनैसर्गिक अत्याचार, टॅक्सी वेश्या वस्तीत न नेल्याने कृत्य
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 12:50 PM

मुंबई : महिलांवरील बलात्काराच्या घटनांनी खळबळ उडवली असताना, इकडे मुंबईत हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलने चक्क टॅक्सीचालकावर जबरदस्ती करत, अनैसर्गिक कृत्य केल्याचा (constable RAPE With Taxi Driver) आरोप आहे. धक्कादायक म्हणजे वेश्या वस्तीत टॅक्सी नेण्यास विरोध केल्याने, कॉन्स्टेबलने थेट टॅक्सीचालकावरच अनैसर्गिक कृत्य केलं. याप्रकरणी आरोपी कॉन्टेबलविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. (constable RAPE With Taxi Driver)

आरोपी कॉन्टेबल हा शनिवारी रात्री पीडित चालकाच्या टॅक्सीत बसला होता. त्यावेळी कॉन्स्टेबलने टॅक्सी ग्रॅण्ट रोड इथल्या वेश्या वस्तीत नेण्यास बजावलं. मात्र टॅक्सी तिकडे नेण्यास चालकाने नकार दिला. त्यावेळी कॉन्स्टेबलने थेट चालकाला मारहाण करुन त्याच्यासोबतच अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पीडित टॅक्सी चालकाने पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. कायदे कडक करुनही महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशी परिस्थिती असताना आता पुरुषांवरही अत्याचार होऊ लागल्याने, वासनांध नराधमांना रोखायचं कसं हा प्रश्न आहे.

आरोपी कॉन्स्टेबल 11 जानेवारीला दुपारी 4 ते रात्री 11 अशी ड्युटी करुन आला होता. त्यावेळी त्याने टॅक्सीचालकाला टॅक्सी डिमेलो रोडकडे नेण्यास सांगितलं. त्यानंतर त्याने टॅक्सी ग्रॅण्टरोडवरील वेश्या वस्तीत नेण्यास बजावलं. मात्र टॅक्सीचालकाने त्याला नकार दिल्याने, कॉन्स्टेबलने त्याला मारहाण केली. आरोपी कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला रेल्वेच्या हद्दीत नेऊन, अनैसर्गिक कृत्य करत बलात्कार केला. याशिवाय कॉन्स्टेबलने त्याचे पैसे आणि चावीही काढून घेतल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. त्याच्याविरोधात कलम 377 अनैसर्गिक कृत्य, कलम 394 लूट यासह कलम 387,341,324,504 आणि 506 (2 ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.