हरीपाठ न केल्याने विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण, आश्रमशाळेतील महाराज पसार

हरी पाठाचे पाठांतर न केल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्याला महाराजांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आळंदीमध्ये घडली (student beaten in school) आहे.

student beaten in school, हरीपाठ न केल्याने विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण, आश्रमशाळेतील महाराज पसार

पुणे : हरी पाठाचे पाठांतर न केल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्याला महाराजांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आळंदीमध्ये घडली (student beaten in school) आहे. भगवान पोव्हाणे असे मारहाण करणाऱ्या महाराजाचे नाव आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या वर्षभरापासून पीडित विद्यार्थी हा आळंदीच्या माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतो. काही दिवसांपूर्वी या शाळेतील महाराज भगवान पोव्हाणे याने सर्व विद्यार्थ्यांना हरी पाठाचे पाठांतर करुन येण्यास सांगितले होते.

मात्र विद्यार्थ्याने हरी पाठाचे पाठांतर केले नाही. त्यामुळे महाराज भगवान पोव्हाणे याने मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही मारहाण लपवण्यासाठी तो पीडित विद्यार्थ्याला घेऊन महाराज औरंगाबादला गेला. त्या ठिकाणी विद्यार्थी बेशुद्ध (student beaten in school) पडला.

यानंतर मुलगा आजारी असल्याची खोटी थाप मारत त्या विद्यार्थ्याला पालकांच्या स्वाधीन केलं. या मारहाणीत त्या विद्यार्थ्याची शुद्ध हरपल्याने पालकांनी त्याला तळेगाव दाभाडे येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण आनंद हॉस्पिटलमध्ये त्या मुलाची तब्येत अजून खालावली. तब्बल चार दिवसांनी पीडित मुलगा शुद्धीवर आल्यानंतर त्याने पालकांना सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर पालकांनी तात्काळ आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी भगवान महाराज पोव्हाणे याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती केली. मात्र आळंदी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला (student beaten in school) आहे.

सध्या पीडित मुलावर पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर यामिनी आडबे यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत पुढाकार घेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना या संपूर्ण गंभीर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली.

अद्याप या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आश्रम शाळेतील महाराजाला ताब्यात घेतलेले नाही. कलम 307 प्रमाणे आरोपी महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी महाराज सध्या पसार (student beaten in school) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *